देव सर्वांचाच आहेना? मग या महिलेला मंदिराबाहेर का काढलं?

आतमध्ये चार जण आहेत, ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यातील एक जण अचानक त्या बाईवर काही तरी ओरडून बोलतो आणि तिचे केस ओढू लागतो.

देव सर्वांचाच आहेना? मग या महिलेला मंदिराबाहेर का काढलं?
woman assaulted for entering in templeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 4:27 PM

देव सर्वांचाच आहे, असं म्हणतात. त्यामुळेच जात-धर्माच्या आधारावर देवदर्शनासाठी मंदिरात जाण्यास कोणालाही मज्जाव केला जात नाही. मात्र, अनेक वेळा अशा घटनाही पाहायला मिळतात, जिथे खालच्या जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही आणि त्यांनी प्रवेश केला तर त्यांना वाईट वागणूक दिली जाते आणि मंदिराबाहेर फेकून दिले जाते. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका दलित महिलेला मंदिरात प्रवेश करताना वाईट वागणूक तर मिळालीच, शिवाय तिला मारहाणही करण्यात आली. हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंदिराच्या आतमध्ये चार जण आहेत, ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यातील एक जण अचानक त्या बाईवर काही तरी ओरडून बोलतो आणि तिचे केस ओढू लागतो.

तो त्या स्त्रीला मंदिराबाहेर घेऊन जाऊ लागतो, तर त्या स्त्रीला बाहेर पडायचं नसतं. या व्हिडीओमध्ये पुरुष महिलेचे केस ओढताना दिसत आहे. जेव्हा ती स्त्री बाहेर जायला तयार नसते, तेव्हा तो तिला चापटही मारू लागतो.

मात्र, कसेबसे तो महिलेला बाहेर खेचतो आणि नंतर दोन-तीन वेळा तिला चापट मारतो. इतकंच नाही तर महिलेला काठीने मारहाण करण्याचाही तो प्रयत्न करतो.

बंगळुरुच्या अमृतहल्ली परिसरातील एका मंदिरात ही घटना घडली. पीडितेनं आरोपी व्यक्तीविरोधात अमृतहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी व्यक्ती मंदिर प्रशासनाचा बोर्ड मेंबर असून 21 डिसेंबर रोजी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींविरोधात IPC कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आहेत. कुणी म्हणतंय की, 2023 मध्ये अशी घटना घडत असेल तर ती शरमेची बाब आहे, तर कुणी म्हणतंय की हा अफगाणिस्तान नाही. त्याचप्रमाणे काही युझर्स आरोपी तुरुंगातच असावेत, असे सांगत आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...