AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ

व्हिडीओतील तरुण इन्स्टाग्रामवर फॉलो करा, चॅनेलला सबस्क्राईब करा असे सांगण्याच्या नादात थेट तलावात पडला आहे. तरुणाचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ
bike accident viral video
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 7:45 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी सध्या तरुण वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. एकदा का चर्चा झाली की आपण लगेच स्टार होऊ अशी भावना या तरुण-तरुणींमध्ये आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणसुद्धा अशाच भावनेने प्रेरित असल्याचे दिसतेय. व्हिडीओतील तरुण इन्स्टाग्रामवर फॉलो करा, चॅनेलला सबस्क्राईब करा असे सांगण्याच्या नादात थेट तलावात पडला आहे. तरुणाचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. (bike rider slip and fell down in lake video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकी चालवताना दिसतोय. दुचाकी चालवताना तो एक हात सोडून बोलतोय. तसेच बोलताना माझे इन्स्टाग्रामचे अकाऊंट फॉलो करा, माझे चॅनेल सबस्क्राईब करा, असे आवाहन तो करतोय. तसेच समोर बोलताना मित्र माझी वाट पाहत असतील. मला तिकडे जावे लागेल, असेही तो सांगतो आहे.

अपघात झाला अन् तरुण थेट तलावात पडला

मात्र, याच वेळी दुचाकी चालवत असताना या तरुणाच्या समोर दुसरी दुचाकी आली आहे. समोरून अचानकपणे दुचाकी आल्यामुळे व्हिडीओतील तरुण चांगलाच गोंधळला आहे. याच कारणामुळे अपघात टाळण्याच्या ऊद्देशाने या तरुणाने त्याची दुचाकी बाजूला वळवली आहे. त्यानंतर हा तरुण थेट तलावात जाऊन पडला आहे. तसे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबद्दल निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ memekaar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून काहींना हसू आवरले नाही. तर काही लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

Video | पक्ष्यांच्या हल्ल्यामध्ये मांजर हतबल, शेवटी पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | वडील उशिराने घरी येत असल्यामुळे मुलगी भडकली, रागात म्हणते ऑफिसमध्येच राहा, पाहा चिमुकलीचा मजेदार व्हिडीओ

(bike rider slip and fell down in lake video went viral on social media)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.