AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावरून चालणाऱ्यांसोबत केला असा काही प्रँक, महिलांचे खावे लागतायत बोलणे; Video viral

Prank Video : एका प्रँक व्हिडिओने सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घातला आहे. ज्यामध्ये एक मुलगा (Boy) वाटेत लोकांसमोर असे काही करतो, ज्यामुळे ते घाबरून जातात. काही लोकांना तो आवडला नसला तरी हा व्हिडिओ पाहून बहुतेक लोक हसत (Laughing) आहेत.

रस्त्यावरून चालणाऱ्यांसोबत केला असा काही प्रँक, महिलांचे खावे लागतायत बोलणे; Video viral
रस्त्यावरून चालणाऱ्यांसोबत या तरुणानं केला प्रँकImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 12:19 PM
Share

Prank Video : ‘सोशल मीडियात रोज एकापेक्षा एक प्रँक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे प्रँक व्हिडिओ लोकांना आवडतात ते एन्जॉय करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रँकशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जातात, तेव्हा ते व्हायरल होतात. या एपिसोडमध्ये आणखी एका प्रँक व्हिडिओने सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घातला आहे. ज्यामध्ये एक मुलगा (Boy) वाटेत लोकांसमोर असे काही करतो, ज्यामुळे ते घाबरून जातात. काही लोकांना तो आवडला नसला तरी हा व्हिडिओ पाहून बहुतेक लोक हसत (Laughing) आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांसमोर असे कृत्य करतो, ज्यामुळे त्या घाबरतात. काही जण उड्याही मारतात. नंतर या महिलांना त्या मुलाचा राग येतो हे दिसते. कारण त्यांना त्याने घाबरवलेले असते.

महिलांना घाबरवतो

व्हिडिओच्या सुरुवातीला दोन महिला रस्त्याने कुठेतरी जात असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक पिवळा टी-शर्ट घातलेला मुलगा त्यांच्या जवळून जात असताना अचानक खाली वाकून उठतो. हे पाहून एक महिला घाबरते. तिला स्वतःला सांभाळता येत नाही. तुम्ही बघू शकता, की तो माणूस निघून गेल्यावर ती स्त्री पुटपुटते आणि त्याला काहीतरी बोलते. त्याचप्रमाणे, मुलगा इतर काही मुलींसोबतही अशाच खोड्या करतो. ज्यामध्ये तुम्हाला ते घाबरताना दिसत आहेत. चला तर मग हा व्हिडिओ पाहू या…

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ?? (@hepgul5)

इन्स्टाग्रामवरून शेअर

हा मजेदार प्रँक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या प्रँक व्हिडिओला 19 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक यूझर्सना ही प्रँक खूप आवडला आहे. यूझर्स इमोटिकॉन्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया नोंदवत असतात. अनेकांना ते इतके मजेदार वाटले, की त्यांनी ते पाहण्यासाठी त्यांच्या मित्रांना कमेंट सेक्शनमध्ये टॅग केले आहे.

आणखी वाचा :

Ice skating : एकाचवेळी स्केटिंग आणि बॅकफ्लिपही तेही बर्फावर..! पाहा, मुलीचा Viral video

Bijlee Bijlee गाण्याची परदेशातही Craze; Violin वाजवून मुलीनं वेधलं सर्वांचं लक्ष

Dahi vada बनवायचा आहे, तो ही 30 सेकंदांत, शक्य आहे? Challenge video होतोय Viral

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.