एकेमकांच्या मांडीवर बसलेल्या मुलांचा ‘हा’ फोटो बघा! फोटो मागचं कारण व्हायरल, चर्चाच चर्चा
वरच्या फोटोत एका बेंचवर मुलं मुली एकमेकांच्या मांडीवर बसलेले आहेत. बस्थानकावर अशी एक घटना घडलीये जी प्रचंड व्हायरल झालीये.
आजकाल सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट किस्से व्हायरल होत आहेत. बस्थानकावर अशी एक घटना घडलीये जी प्रचंड व्हायरल झालीये. वरच्या फोटोत एका बेंचवर मुलं मुली एकमेकांच्या मांडीवर बसलेले आहेत. ही मुलं आंदोलन करतायत. आता तुम्ही म्हणाल कसलं आंदोलन? खरं तर हे बस स्थानक याच आंदोलनामुळे प्रचंड व्हायरल झालेलं आहे. भारतात एक ठिकाणी बस स्थानकाच्या एका बाकड्यावर मुलं मुली एकत्र बसणं इथल्या स्थानिक लोकांना मान्य नव्हतं मग त्यांनी या बाकड्याचे तीन भागात तुकडे केले. या सगळ्याला विरोध दर्शविण्यासाठी ही मुलं एकमेकांच्या मांडीत बसलीयेत. काय आहे संपूर्ण किस्सा जाणून घेऊया…
त्रिवेंद्रमच्या स्थानिकांना या बसस्थानकाच्या एकमेव बाकावर मुलं मुली एकत्र बसणं आवडत नव्हतं. खरं तर यामुळे हा सारा वाद सुरू झाला.
आता या प्रकरणात प्रशासनाने उघडपणे आपली बाजू मांडलीये. आता हे बस स्थानक नव्यानं उभारण्यात येणारे.
या बाकावर मुलामुलींना एकत्र बसता येऊ नये म्हणून स्थानिकांनी या एका बाकड्याचे तीन भाग केले. यानंतर तरुणांनी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून इथे बसून याविरोधात निषेध नोंदवला.
या प्रकरणाबाबत महापौरांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बस स्थानकावरील बेंच अशाप्रकारे कापणे ‘अयोग्य’ आहे.
अशी घटना केरळसारख्या पुरोगामी समाजावरही अन्याय करणारी आहे. राज्यात (केरळ मुलं मुली एकत्र बसण्यास बंदी नाही. दरम्यान या किस्स्याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेक लोकांकडून याला विरोध सुद्धा दर्शविण्यात आलाय.