Video | तरुण रस्त्यावरच लागले क्रिकेट खेळायला, मध्येच दुचाकी आली अन् सगळं बिघडलं, मजेदार व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओमध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळताना तरुणांची चांगलीच मज्जा आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसायला लागले आहेत.

Video | तरुण रस्त्यावरच लागले क्रिकेट खेळायला, मध्येच दुचाकी आली अन् सगळं बिघडलं, मजेदार व्हिडीओ पाहाच
cricket-funny-video
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:35 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर क्रिकेट खेळताना तरुणांची चांगलीच मज्जा आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसायला लागले आहेत. (boys playing cricket on road funny video went viral on social media)

क्रिकेट खेळण्यासाठी तरुणांनी रस्त्यावरच स्टंप उभे केले

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे आपल्याला खळखळून हसवणारे असतात. लोकांनी केलेली करामत तसेच काहीतरी काम करताना लोाकांची उडालेली धांदल या व्हिडीओंमध्ये चपखलपणे दाखवलेली असते. याच कारणामुळे हे व्हिडीओ चर्चेत असतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा तुम्हाला खळखळून हसायला लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण रस्त्यावरच क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी या तरुणांनी रस्त्यावरच स्टंप उभे केले आहेत. तसेच काही तरुण क्षेत्ररक्षणासाठीसुद्धा उभे असेल्याचे आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतंय.

फलंदाजाला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली

गोलंदाजाने फलंदाजाकडे चेंडू फेकल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. फलंदाजाने चेंडूला मोठ्या शिताफीने परतवले आहे. तो धावा काढण्यासाठी रस्त्यावर पळताना आपल्याला दिसतोय. मात्र, याच वेळी एक अपघात घडला आहे. फलंदाज पळत असताना मागून एका दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली आहे. या धडकेमुळे फलंदाजाला लागले आहे. तसेच जोरदार धडक झाल्यामुळे दोन दुचाकीस्वारसुद्धा खाली पडले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना हसू आलं आहे. तर काही लोकांनी या अपघाताने कदाचित गंभीर स्वरुप धारण केले असते. आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर असा खेळ मांडणे चुकीचे आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ‘jatt.life’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | लाकडी फळीच्या मदतीने भारी जुगाड, पण मध्येच खेळ बिघडला, दुचाकी थेट पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल

Video | इंजेक्शन पाहून घाबरली, सुई टोचताच मुलांसारखं लागली रडायला, महिलाचे मजेदार व्हिडीओ व्हायरल

(boys playing cricket on road funny video went viral on social media)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.