Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओसुद्धा असाच सर्वांना चकित करणारा आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण पेट्रोलच्या मदतीने भर रस्त्यावर आगीशी खेळत आहेत.

Video | भर रस्त्यावर मृत्यूशी खेळ, तोंडात पेट्रोल टाकून आगीवर शिंपडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
FIRE ON ROAD VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 3:52 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण चकित होऊन जातो. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओसुद्धा असाच सर्वांना चकित करणारा आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण पेट्रोलच्या मदतीने भर रस्त्यावर आगीशी खेळत आहेत. (boys playing with fire video went viral on social media)

तरुणांकडून आग शिलगवण्याचा प्रयत्न 

या व्हिडीओमध्ये काही तरुण दिसत आहेत. भर रस्त्यावर लागलेल्या आगाशी ते खेळत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात आग लागलेली नसताना हे तरुण पेट्रोलच्या मदतीने आगीला शिलगवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे तरुण त्यांच्या तोंडात असलेले पेट्रोल समोरच्या आगीवर शिंपडत आहेत. त्यांचा हा कारनामा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पेट्रोल शिंपडताच आगीचा भडका उडाला

या व्हिडीओमध्ये जवळपास दोन ते तीन तरुण दिसत आहेत. एकापाठोपाठ एक येऊन ते आपल्या तोंडातील पेट्रोल आगीवर शिंपडत आहेत. पेट्रोल शिंपडताच भर रस्त्यावर आगीचा भडका उडालेला दिसतोय. तसेच आगीचा भडका उडालेला पाहून या तरुणांना चांगलाच आनंद होतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा थरारक व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत. तरुणांनी आगीशी खेळणे महागात पडू शकते, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांना व्हिडीओतील तरुणांची करामत पाहून आनंद झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला urban._jatts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

इतर बातम्या :

Video | केस धुताना महिलेची सारखी चुळबूळ, शेवटी हेअर स्टायलिस्टला राग अनावर, पुढं जे झालं ते एकदा पाहाच !

VIDEO | स्कॉर्पिओच्या बॉनेटवर बसून लग्नाला निघाली, पुण्यात नववधूसह वऱ्हाडींवर गुन्हा

Video | नवरदेवाने रोमँटिक अंदाजात गुलाबजाम भरवला, नवरीच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी, पाहा नेमकं काय घडलं ?

(boys playing with fire video went viral on social media)

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.