Video | नवरी दिसताच नवरदेव खुलला, वाजवली लग्नमंडपातच शिट्टी, मजेदार व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये नवरी दिसताच नवरदेवाला अतिशय आनंद झाला आहे. नवरीला पाहून त्याने उत्साहात शिट्टी वाजवली आहे. एवढेच नव्हे तर गर्दीमध्ये जाऊन नवरदेव त्याच्या नवरीसोबत डान्स करत आहे.

Video | नवरी दिसताच नवरदेव खुलला, वाजवली लग्नमंडपातच शिट्टी, मजेदार व्हिडीओ व्हायरल
MARRIAGE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:46 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. या मजेदार व्हिडिओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. तर काही व्हिडीओ हे अतिशय थरारक असतात. मात्र सध्या लग्नसमारंभातील एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये नवरी दिसताच नवरदेवाला अतिशय आनंद झाला आहे. नवरीला पाहून त्याने उत्साहात शिट्टी वाजवली आहे. एवढेच नव्हे तर गर्दीमध्ये जाऊन नवरदेव नवरीसोबत डान्स करत आहे. (bride and groom dancing very happy in marriage function video went viral on social media)

नवरीने लग्न मंडपात प्रवेश करताच नवरदेव हरखून गेला

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ एका लग्नसमारंभातील आहे. नवरी-नवरदेव यांना आशीर्वाद देण्यासाठी या लग्नसोहळ्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नवरी आणि नवरदेव यांचे नातेवाईक नटून-थटून या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. यावेळी नवरीने लग्न मंडपात प्रवेश करताच नवरदेव हरखून गेला आहे.

सर्व नातेवाईक नवसीसोबत नाचत आहेत

नवरदेवाने नवरीला पाहून शिट्टी वाजवली आहे. तसेच नवरदेवाला पाहिल्यानंतर नवरीसुद्धा नाचत असल्याचे आपल्याला दिसत आहे. नवरीच्या बाजूला तिच्या नातेवाईकांनी गर्दी केलीये. हे सर्व नातेवाईक नवसीसोबत नाचत आहेत. त्यानंतर नवरदेवसुद्धा नवरीकडे गेल्याचे आपल्याला दिसत आहे.

नवरीजवळ जाऊन नवरदेवाचा भन्नाट डान्स

गर्दीतून वाट काढत नवरदेव नवरीकडे गेला आहे. नवरीजवळ जाऊन तो तिच्यासोबत मजेदार डान्स करतोय. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद करण्यात आला आहे. नवरी-नवरदेवाचा उत्साह पाहून नेटकरी भारावले आहेत. कदाचित याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ लोक उस्फूर्तपणे शेअर करत असून त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत.

इतर बातम्या :

Video | नक्कल करण्याच्या नादात मोठा घोळ, भाऊ थेट जमिनीवर आदळला, स्टंटचा मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | नवरदेव प्रेमाने घास भरवायला गेला, नवरीने मात्र भलतंच केलं, व्हिडीओ व्हायरल

Video | भररस्त्यात दोन महिलांची मारामारी, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

(bride and groom dancing very happy in marriage function video went viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.