AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | इच्छेविरुद्ध लग्न होत असल्यामुळे नाराज, भर मंडपात नवरीने केलं ‘हे’ काम, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे. लग्नसोहळ्यादरम्यान पाहु्ण्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. तसेच नवरदेवाचे मित्र नव्या जोडीचे फोटोदेखील काढत आहेत.

Video | इच्छेविरुद्ध लग्न होत असल्यामुळे नाराज, भर मंडपात नवरीने केलं 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल
MARRIAGE VIDEO
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील अनेक व्हिडीओ असे असतात ज्यांना पाहून आपण हरखून जातो. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभात नवरी चांगलीच रुसल्याचं आपल्याला दिसत आहे. भर मंडपात नवरी रुसल्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. (bride feeling nervous during marriage ceremony video went viral on social media)

लग्नाची धूम, मित्रांची मस्ती

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे. लग्नसोहळ्यादरम्यान पाहु्ण्यांनी गर्दी केली आहे. तसेच नवरदेवाचे मित्र नव्या जोडीचे फोटोदेखील काढत आहेत. मात्र, या सर्व गर्दीमध्ये नवरी मात्र काहीशी नाराज आहे. धामधुमीमध्ये हा सोहळा सुरु असताना नवरी मात्र नाक मुरडत आहे. हा सगळा प्रसंग नेटकऱ्यांना अचंबित करुन टाकतोय.

नवरी नाराज, भर मंडपात वरमाला करतेय खराब

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. ते एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी थांबल्याचे दिसतेय. नवरदेव जरी खूश असला तरी नवरी मात्र नाराज आहे. नवरी तिच्या हातामध्ये असलेल्या वरमालेला खराब करत आहे. तसेच वरमलेवर लावलेल्या फुलांना ती तोडून टाकत आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

शेवटी महिलांनी नवरीला समजाऊन सांगितलं

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. नवरीने वरमाला खराब करुन टाकल्यावर काही महिला तिला समजावून सांगत आहेत. एक महिला तर मंचावर येऊन नवरीच्या हातातील वरमाला व्यवस्थित करताना दिसत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काही सेकंदाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअरही करत आहेत. चर्चेता आलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला तुम्हाला इन्स्टाग्रामवर official_niranjan_kgm या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या 

VIDEO: ढोलकीच्या तालावर मुलाने असा काही आळवला सूर; गाणं ऐकून नेटिजन्स म्हणाले…

Video | ‘क्युटी पाय’ गाण्यावर क्यूट आजी आणि नातीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फिदा!

Video | पांढरे शुभ्र ढग, निळेशार पाणी, वैमानिकाला जग कसं दिसतं ? डोळ्याचे पारणे फेडणारा हा व्हिडीओ पाहाच

(bride feeling nervous during marriage ceremony video went viral on social media)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.