नवरदेवाने नवरीला हॉस्पिटलच्या वॉर्डातून उचलून मंडपात आणले, एका लग्नाची गोष्ट!
आपण कधी रुग्णालयात झालेले लग्न पाहिले आहे का? एक तरुण आपल्या नवरीसाठी चक्क रामगंजमंडी पासून कोटाच्या हॉस्पिटलमध्ये पोहचलाय.
कोणत्याही लग्न समारंभासाठी पसंतीची ठिकाणे म्हणजे एकतर मोठे फार्महाऊस, हॉटेल-लॉन सह हॉल किंवा मंदिर, मशीद किंवा चर्च सारखी धार्मिक स्थळे, परंतु आपण कधी रुग्णालयात झालेले लग्न पाहिले आहे का? एक तरुण आपल्या नवरीसाठी चक्क रामगंजमंडी पासून कोटाच्या हॉस्पिटलमध्ये पोहचलाय. जयमाला विधी व इतर विधी करण्यासाठी एक कॉटेज रूमही बुक करण्यात आली होती. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला असून वधूवर सध्या रुग्णालयात फ्रॅक्चरवर उपचार सुरू आहेत.
पंकज राठोड असे या नवरदेवाचे नाव असून तो रामगंजमंडीतील भावपुरा इथला रहिवासी असून वधू मधू राठोड रावतभाटा इथे राहते. वधू 15 व्या पायऱ्यांवरून खाली पडली, ज्यामुळे तिच्या दोन्ही हात-पायाला फ्रॅक्चर झाले.
या अपघातात तिच्या डोक्यालाही दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करावे लागले. अपघातानंतर लग्न कसे पुढे न्यावे याबाबत पंकजच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा झाली. या संभाषणादरम्यान पंकजने मधूशी हॉस्पिटलमध्ये लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंकजचे मेहुणे राकेश राठोड यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांनी रुग्णालयात लग्न करण्यास सहमती दर्शविली आणि कॉटेज बुक करून ती सजवली. लग्नाचे विधी पार पडले आणि नवऱ्याने स्वत: वधूला वॉर्डातून मंडपात आणले. सर्व विधी इतर लग्नासारखे होते. मात्र वधूला चालता येत नसल्याने आगीभोवती सात फेऱ्या होऊ शकल्या नाहीत. लग्नानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यांनी सांगितले की, वधूला पुढील काही दिवस रुग्णालयात दाखल केले जाईल. अशावेळी वधू आणि त्याचे कुटुंबीयही वधूची काळजी घेतील.