मालकाचं भारी नुकसान! म्हशी डायरेक्ट स्विमिंग पूल मध्येच घुसल्या, व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांना धक्काच बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 म्हशी शेजारच्या शेतातून पळून अचानक या दाम्पत्याच्या घराबाहेरील स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या. हे दृश्य लोकांसाठी हास्यास्पद असू शकते, परंतु जोडप्यासाठी दु:स्वप्नापेक्षा कमी नाही. अनेक म्हशींनी सकाळी त्यांच्या स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारली.
मुंबई: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात म्हशींचा कळप एका नवीन स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांना धक्काच बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 म्हशी शेजारच्या शेतातून पळून अचानक या दाम्पत्याच्या घराबाहेरील स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या. हे दृश्य लोकांसाठी हास्यास्पद असू शकते, परंतु जोडप्यासाठी दु:स्वप्नापेक्षा कमी नाही. अनेक म्हशींनी सकाळी त्यांच्या स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारली.
घरातील जलतरण तलावात म्हशींचा शिरकाव
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की, अनेक म्हशी त्या स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या आणि एकापाठोपाठ एक डुबकी मारू लागल्या. म्हशी तलावात जाऊ लागल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ही घटना गेल्या वर्षी जुलै महिन्यात घडली होती. अँडी स्मिथ म्हणाला, “माझी बायको सकाळचा चहा बनवायला गेली तेव्हा तिने स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर तलावात आठ म्हशी आंघोळ करत होत्या.” तिने अग्निशमन दलाला फोन केला पण त्यांनी खोटे कॉल स्वीकारत नसल्याचे सांगितले, त्यांनी आमच्या फोनला गांभीर्याने घेतले नाही”.
It’s hot but it’s not that hot! Moment herd of escaped water #buffalo stampede through couple’s garden and take dip in their swimming pool – causing £25,000 in damage to their Colchester #Essex home pic.twitter.com/uYM8kZpwgP
— Hans Solo (@thandojo) May 23, 2023
दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांचे 25,000 पौंड (25,00,000 रुपये) नुकसान झाले आहे. अँडी आणि लायनेट स्मिथ नावाचे हे जोडपे आता निवृत्त झाले आहे आणि आता ते आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत, परंतु या घटनेने त्यांना धक्का बसलाय कारण त्यांचं खूप नुकसान झालंय. अहवालानुसार, 70 लाख रुपयांनी बनवलेल्या या जलतरण तलावात आठ म्हशी उतरल्या. त्या इतक्या जास्त असल्यामुळे साहजिकच तलाव उद्धवस्त झाला. म्हशी पळून गेल्या आणि त्यांना कोणतीही इजा झाली नाही.