Video | मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, जीव वाचवण्यासाठी प्रवासी सैरावैरा, थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद
नैनिताल तसेच इतर भागात दोन दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील काही दिवसांपूसन उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर नैनितालच्या वीरभट्ट पुलाजवळ दरड कोसळण्याची ही घटना घडली. या घटनेत एक बस जात असताना मुसळधार पावसामुळे भूसभूशीत झालेल्या डोंगराचा भाग अचानकपणे कोसळला.
नैनिताल : मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याची एक धक्कादायक घटना घाडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत बसचालकाने थोडीजरी चूक केली असती, तरी कित्येक प्रवाशांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला असता. शुक्रवारी (20 ऑगस्ट 2021) नैनितालच्या वीरभट्ट पुलाजवळ दरड कोसळण्याची ही घटना घडली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (bus escape from fatal accident in nainital landslide accident)
भूसभूशीत झालेल्या डोंगराचा भाग अचानकपणे कोसळला
नैनिताल तसेच इतर भागात दोन दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील काही दिवसांपूसन उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. याच पार्श्वभूमीवर नैनितालच्या वीरभट्ट पुलाजवळ दरड कोसळण्याची ही घटना घडली. या घटनेत एक बस जात असताना मुसळधार पावसामुळे भूसभूशीत झालेल्या डोंगराचा भाग अचानकपणे कोसळला.
पाहा व्हिडीओ :
बस वेळीच थांबवल्यामुळे जीवितहानी टळली
दरड कोसळण्याचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे पुढे जाणे योग्य नाही, याचा बसचालकाला अंदाज आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. बसचालकने ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याच्या अलीकडेच बस थांबवली आहे. तसेच त्याने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांनी बस खाली केल्याने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यामुळे उत्तराखंड सरकार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे.
इतर बातम्या :
Video | डोसा खाण्यासाठी लोकांची झुुंबड, तयार होण्याआधीच तुटून पडले, नेटकरी अवाक्
Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल
(bus escape from fatal accident in nainital landslide accident)
Video : Know This : भारताच्या मिल्ट्रीत ट्रेनिंग तरीही Taliban ला मिळाला, कोण आहे Sher Mohammad Stanikzai?
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv
#KnowThis #Taliban #SherMohammadStanikzai pic.twitter.com/c8etfusqf2
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 21, 2021