Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत एका चर्चच्या टॉवरवर जाऊन क्रॉसला आग लावली आहे. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे घडली असून पोलिसांनी या माथेफिरुस अटक केले आहे.

Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ
california church fire viral video
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 3:50 PM

कॅलिफोर्निया : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात तर काही व्हिडीओंना पाहून अंगाचा थरकाप उडतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ यापेक्षा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत एका चर्चच्या टॉवरवर जाऊन क्रॉसला आग लावली आहे. ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे घडली असून पोलिसांनी या माथेफिरुस अटक केले आहे. चर्चच्या टॉवरवर जाऊन आग लावतानाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (California half naked man climbs on Church tried to set fire cross video went viral on social media)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियमध्ये एक माथेफिरु अर्धनग्नावस्थेत एका चर्चवर चढला. हे चर्च एकूण चार मजली असून त्याचे नाव सेंट मेरी कॅथोलिक चर्च असे आहे. याच चर्चच्या बेल टॉवरवर चढून या माथेफिरुने क्रॉसला आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच हे कृत्य केल्यानंतर त्याने छतांवर उड्या मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला लगेच जेरबंद केले.

अग्निशमन दलाने चर्चवरील आग पूर्णपणे विझवली

ही घटना घडल्यानंतर लॉस एंजेलिस फायर डिपार्टमेंटने याविषयी अधिक माहिती दिली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच अग्निशमन दलाने चर्चवरील आग पूर्णपणे विझवली. आग पूर्णपणे विझल्याची खात्रीदेखील अग्निशमद दलाच्या जवानांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ :

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान ही घटना मागील काही दिवसांपूर्वीची असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. घडलेला हा प्रकार पाहून पोलिसांनीसुद्धा आरोपीला अटक केली असून ते पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | उंची 20 इंच, वजन 26 किलो, ‘राणी’ला पाहण्यासाठी लोकांची गर्दी, जगातील सर्वांत लहान गाय असल्याचा दावा

(California half naked man climbs on Church tried to set fire cross video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.