Video : वयाच्या 75 व्या वर्षीही आजोबांचा जबरदस्त फिटनेस, शीर्षासनाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद
हा व्हीडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'हेडस्टँड करण्यासाठी सर्वात वयस्कर व्यक्ती 75 वर्षीय टोनी हॅलो', असं याला कॅप्शन दिलं आहे.
मुंबई : वय वाढतं तसं शरिराची कमा करण्याची क्षमता कमी होते. पण काही लोक याला अपवाद असतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते एकदम फिट (Fitness) असतात.असाच एक व्हीडीओ समोर आला आहे. याला पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. शीर्षासन करत असलेल्या एका 75 वर्षीय व्यक्तीचा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती या वयातही एकदम फिट आहे. अन् शीर्षासन (Headstand) करताना दिसत आहे.
कॅनडातील ड्यूक्स-मॉन्टॅग्नेस येथे राहणारा टोनी हेलो यांचा हा व्हीडिओ आहे. अशी कामगिरी करणारी ही सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्यांन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या व्हीडिओमध्ये टोनी हेडस्टँडसाठी तयार असताना दिसत आहे. विशेष म्हणजे टोनी हॅलो यांनी 16 ऑक्टोबर 2021 ला वयाची 75 वर्षे आणि 33 दिवसांमध्ये हा विक्रम केला.
View this post on Instagram
हा व्हीडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘हेडस्टँड करण्यासाठी सर्वात वयस्कर व्यक्ती: 75 वर्षीय टोनी हॅलो’, असं याला कॅप्शन दिलं आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये नावाची नोंद झाल्यानंतर टोनीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मला माझ्या कुटुंबाकडून ही कृती हा रेकॉर्ड करण्याची प्रेरणा मिळाली होती. परंतु कोणत्याही वयात महान गोष्टी साध्य करणं, शक्य आहे हे देखील सिद्ध करायचं होतं. मी वयाच्या 55 व्या वर्षी फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरू केलं. दररोज धावणे, पुशअप्स आणि हेडस्टँड्स करून फिट राहण्यासाठी प्रयत्न सुरी केले. मी एकदा या कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवलं, की मग मी हेडस्टँडचा सराव सुरू केला. घरी, उद्यानात आणि कुटुंब आणि मित्रांसमोर सगळीकडे मी याचा सराव केला. अन् आता त्याचं फळ मला मिळालंय”