AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: ‘बाबा रे…मेरेकु तो ऐसे धक-धक होरेला है!’ डेंजर व्हिडीओ! भाई असं कसं मनात येईल तसं?

बरं मग कर चालकाने जे केलं ते केलं पण त्यामुळे मागच्या दोन चालकांची जी काय अवस्था वाईट झाली आणि तरीही त्यांनी जशा प्रकारे वेळ मारून नेली हे मात्र कौतुकास्पद आहे.

Viral Video: 'बाबा रे...मेरेकु तो ऐसे धक-धक होरेला है!' डेंजर व्हिडीओ! भाई असं कसं मनात येईल तसं?
डेंजर व्हिडीओ! Image Credit source: Twitter
| Updated on: May 30, 2022 | 11:52 AM
Share

पॅनिक ब्रेकिंग (Panic Breaking) नावाचा एक प्रकार असतो! एकदम स्पीडमध्ये (Speed) धावणारी गाडी अचानक ब्रेक मारते आणि मागून येणाऱ्या सगळ्या गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. बरेचदा आपल्याला अल्लड पोरं बाईकिंग करताना दिसतात. ज्यात ते बाईकला घेऊन बऱ्याच प्रकारचे स्टंट मारत असतात. पण बाईकिंग करणाऱ्या लोकांना माहित असतं कि आपण असे स्टंट्स करणार आहोत.रोजच्या आयुष्यात प्रवास करताना जेव्हा एखादी ठराविक स्पीडने धावणारी गाडी अचानक ब्रेक मारते तेव्हा प्रश्न लोकांच्या आयुष्याचा असतो. कारण अचानक ब्रेक एकच गाडी मारते पण त्यामुळे मागच्या सगळ्या गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. असाच एक व्हिडीओ वायरल होतोय ज्यात प्रचंड वेगाने धावणारी गाडी अचानक ब्रेक (Panic Breaking Viral Video) मारते आणि मग त्या मागच्या गाड्या ज्या काही पद्धतीनं गंडतात ते बघून अंगावर काटा उभा राहतो.

वेळ मारून नेली

‘पॅनिक ब्रेकिंग’ म्हणजे भीतीपोटी ब्रेक मारणं आणि मग अपघात होणं. तर, एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका कार चालकाने हायवेच्या मधोमध असं काही केलं कि जे पाहून तुम्ही घाबरून जाल. बरं मग कर चालकाने जे केलं ते केलं पण त्यामुळे मागच्या दोन चालकांची जी काय अवस्था वाईट झाली आणि तरीही त्यांनी जशा प्रकारे वेळ मारून नेली हे मात्र कौतुकास्पद आहे.

गाडी वाचते, चालकही वाचतो

या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळतंय की, महामार्गावर एक पांढऱ्या रंगाची कार फिरत आहे मात्र अचानक गाडीचा चालकाला लक्षात येतं की आपल्याला दुसरीकडे जायचंय मग तो गाडीला ब्रेक मारतो. मागून भरधाव वेगाने ट्रक येत असतात. ट्रकचालक गाडी वाचवण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात त्याचा ट्रक उलटतो, पण तो गाडीला काहीही होऊ देत नाही. गाडी वाचते, चालकही वाचतो.

कारचालक त्याच्याच नादात

पण या सगळ्यात कारचालक त्याच्याच नादात आहे. तो मात्र हळूहळू गाडी चालवत राहतो, ज्या वळणावर जायचंय तिकडे जात राहतो. एक ट्रक गेल्यावर मागून अजून एक ट्रक येतो आणि तोही एक मोठा फास्ट ब्रेक दाबतो.अख्खा ट्रक वळतो हे बघताना तर काळजाचा ठोका चुकतो. हा दुसरा ट्रक चालकसुद्धा वेळ मारून नेतो आणि तो गाडी अगदी आरामात त्या सिच्युएशन मधून बाहेर काढतो. हा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड वायरल झालाय. कित्येक मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ कुठे आहे हे मला माहीत नाही, पण तो नक्कीच काळजाचा ठोका चुकवेल असा आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.