Video | भाजप कार्यकर्ते इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

दुमना या विमानतळावर दिल्लीसाठी इंडिगोने नवीन विमान सुरू केले आहे. त्यासाठी इंडिगोने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भाजपेचे काही नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमात काही कारणामुळे भाजप कार्यकर्ते आणि इंडिगो एअरलाईन्स यांच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. नंतर हा वाद वाढत गेल्यामुळे वादाचे पर्यवसान भांडणात झाले.

Video | भाजप कार्यकर्ते इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांत हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
MADHYA PRADESH BJP CLASH
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 10:13 PM

जबलपूर : मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि इंडिगोचे अधिकारी यांच्यात तुफान हाणामारी झाली. जबलपूर येथील दुमना विमानतळावर हा प्रकार घडला. या हाणामारीने नंतर टोकाचे स्वरुप धारण केल्यामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घेऊन प्रकरण शांत करावे लागले. भाजप कार्यकर्ते तसेच इंडिगोचे अधिकारी यांच्यातील वाद आणि हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला, याची माहिती मिळू शकलेली नाही. (clash between BJP activists and Indigo Airlines employees in Madhya Pradesh went viral on social media)

भाजप कार्यकर्ते आणि इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद

मिळालेल्या माहितीनुसार जबलपूर येथील दुमना या विमानतळावर दिल्लीसाठी इंडिगोने नवीन विमान सुरू केले आहे. त्यासाठी इंडिगोने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात भाजपेचे काही पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमात काही कारणामुळे भाजप कार्यकर्ते आणि इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. नंतर हा वाद वाढत गेल्यामुळे वादाचे पर्यवसान भांडणात झाले. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि एअरलाईन्सचे प्रतिनिधी यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. या दोन्ही गटामध्ये हाणामारीसोबतच शाब्दिक चकमकदेखील झाली.

पाहा व्हिडीओ :

हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली

भाजप कार्यकर्ते आणि एअरलाईन्सचे प्रतिनिधी यांच्यातील हाणामारी आणि शाब्दिक चकमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. हा वाद चांगलाच टोकाला गेल्यामुळे शेवटी हाणामारी रोखण्यासाठी विमानतळावरील अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांना पाचारण करुन नंतर हे भांडण मिटवण्यात आले. या भांडणाची मध्य प्रदेश तसेच संपूर्ण भारतभर एकच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video |पिळदार देह, मनात दृढनिश्चय, पठ्ठ्याने कोणत्याही आधाराविना रॉडवर साधलं बॅलेन्स

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?

Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

(clash between BJP activists and Indigo Airlines employees in Madhya Pradesh went viral on social media)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.