‘आई काळजी करु नको, तू लवकर बरी होणार, तुला घरी घेऊन जाऊ’, रुग्णालयातील महिलेला मुलांचं भावनिक पत्र

आपल्या घरातील मुख्य गृहिणी म्हणजेच आईला जर कोरोनाची लागण झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर संपूर्ण कुटुंबाची काय अवस्था असते, हे कधीच शब्दांमध्ये सांगता येणार नाही (Viral emotional letter to Corona Positive mother)

'आई काळजी करु नको, तू लवकर बरी होणार, तुला घरी घेऊन जाऊ', रुग्णालयातील महिलेला मुलांचं भावनिक पत्र
रुग्णालयातील महिलेला मुलांचं भावनिक पत्र
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 8:07 PM

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोना विरोधात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, प्रशासन दिवसरात्र झटत आहेत. मात्र, तरीही हे संकट कमी होताना दिसत नाहीय. या संकट काळात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. काही वेळा कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड मिळत नाही म्हणून त्यांच्या होणाऱ्या हेळसांडचा व्हिडीओ व्हायरल होतोय. काही स्मशानभूमींमध्ये मृतदेहांच्या रांगा लागल्याचे फोटो व्हायरल होत आहेत, काही ठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे व्हिडीओ, तर काही वेळा 100 पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांनी कोरोनावर मात केल्याचे सकारात्मक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. आता देखील या महामारीतील एक सकारात्मक आणि सुंदर असं छोटसं पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी घालमेल आणि घुसमट या पत्रातून अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट होताना दिसतेय (Viral emotional letter to Corona Positive mother).

आपल्या घरातील मुख्य गृहिणी म्हणजेच आईला जर कोरोनाची लागण झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं तर संपूर्ण कुटुंबाची काय अवस्था असते, हे कधीच शब्दांमध्ये सांगता येणार नाही. आईच काय घरातील कोणताही सदस्य असला तरी आतमधून खूप तुटतो माणूस. खूप काळजी वाटते. पण अशावेळी खंबीरपणे उभं राहणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता संकट तर घरावर आलं आहे. त्याच्यापासून पळ काढता येणार नाही. आता येईल त्या परिस्थितीला फक्त तोंड देणं हेच आपल्या हातात. पण सकारात्मक राहून जर लढा दिला. तर ती झुंज यशस्वी ठरु शकते. हाच विचार करुन जर लढलं तर नक्कीच यातून आपण सावरु शकतो. या सकारात्मक विचारासंबंधित एक छोटसं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. हे पत्र रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेल्या तिच्या मुलांनी लिहिलं आहे.

सोशल मीडियावर पत्र व्हायरल

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या पत्रात खूप सुंदर असा भावनिक आधार देण्यात आला आहे. एका घरातील कोरोनाबाधित महिला रुग्णालयात उपचार घेत आहे. ही महिला कदाचित साठीच्या घरात असेल. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या महिलेचे मुलं तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यांनी या महिलेला एक छोटसं भावनिक आधार देणार पत्र पाठवलं आहे. या पत्रात तिला ती बरी होत असून तिला लवकरच घरी घेऊन जाऊ, असं सांगण्यात आलं आहे. हे पत्र आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलं आहे. या पत्राच्या फोटोला त्यांनी एक सुंदर पत्र असं कॅप्शन दिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पत्रात नेमकं काय?

“आई आम्ही खाली आहोत. तुमच्या तब्येतीत सुधारणा आहे. काळजी करु नका. आम्ही तुम्हाला घरी घेऊन जावू. तुमचाच मुनमुन, बुलबुल, गुडिया, विकास”, असं पत्रात म्हटलं आहे (Viral emotional letter to Corona Positive mother).

देशातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 65 लाख 30 हजार 132 वर गेला आहे. देशात 2 कोटी 34 लाख 25 हजार 467 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 99 हजार 266 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 28 लाख 5 हजार 399 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 50 लाख 4 हजार 184 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांनी ही काळजी घ्यावी! ब्लॅक फंगसचा संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिला सल्ला

‘कोरोनाची लसचं नव्या व्हेरियंट्सना कारणीभूत’, नोबेल विजेत्या फ्रेंच प्रोफेसरचा धक्कादायक दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.