Viral Video | बासरीच्या कर्णमधूर सुरात कावळ्याचे ‘ताल से ताल मिला,’ सोशल मीडियावर व्हिडीओची एकच चर्चा
बासरीच्या सुराचे अनेक लोक दिवाने असतात. मात्र याच बासरीवर चक्क एका कावळ्याचा जीव जडलाय. हा कावळा बासरीतून निघालेले सुर आपल्या आवाजातून कॉपी करतोय. बासरीतून उमटेलेल सुर कावळा गाण्याचा प्रयत्न करतोय. हाच व्हिडीओ ध्या व्हायरल होत आहे.
मुंबई : गाणं ऐकणं प्रत्येकालाच आवडतं. कर्णमधूर आवाज ऐकल्याने अनेकांचा मूड एकदम फ्रेश होतो. कधी एखादी धूनदेखील आपल्याला तरोताजा करुन टाकते. अनेक वाद्ये असे आहेत की त्यांच्यातून सुर उमटताच आपले अंग थिरकायला लागते. तर काही सुमधूर आवाज आपल्याला ऐकतच राहावेसे वाटते. बासरीचा आवाजही त्यापैकीच एक आहे. दस्तुरखुद्द श्रीकृष्ण बासरी वाजवायचे. बासरीच्या (Flute) सुराचे अनेक लोक दिवाने असतात. मात्र याच बासरीवर चक्क एका कावळ्याचा जीव जडलाय. हा कावळा बासरीतून निघालेले सुर आपल्या आवाजातून (Music) कॉपी करतोय. बासरीतून उमटेलेल्या सुरासोबत कावळा गाण्याचा प्रयत्न करतोय. हाच व्हिडीओ (Viral Video) ध्या व्हायरल होत आहे.
कावळा बासरीसोबत गाण्याचा करतोय प्रयत्न
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. या व्हिडीओमध्ये एक माणूस बासरी वाजवत असल्याचे दिसतेय. तर दुसरीकडे त्याच्या मांडीवर एक कावळा बसलेला आहे. हा कावळा आपल्या आवाजात बासरीतून निघालेले सुर जसेच्या तसे गाण्याचा प्रयत्न करतोय. बासरी वाजवणाऱ्या व्यक्तीने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केलाय.
पाहा व्हिडीओ :
Making music together.. ? pic.twitter.com/cb7eFayUt7
— Buitengebieden (@buitengebieden_) January 29, 2022
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. नेटकहरी हा व्हिडीओ लाईक तसेच शेअरदेखील करतायत. हा व्हिडीओ सध्या ट्विटरवर @buitengebieden याअकाऊंटवर पाहायला मिळेल. व्हिडीओ शेअर करताना माणसाने मजेदार कॅप्शन दिले आहे. ‘सोबत म्यूझिक तयार करताना’ असं या माणसाने कॅप्शनमध्ये म्हटलंय. या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 38 हजार लोकांनी पाहिले आहेत. तर 14 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला शेअर केले आहे.
इतर बातम्या :