Video | हिमतीने कॅन्सरला हरवलं, गोड मुलाचे शाळेत जंगी स्वागत, चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी भावुक

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अतिशय उत्साहवर्धक आणि प्रेरणा देणारा आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसतोय. हा मुलगा चक्क कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन आला आहे.

Video | हिमतीने कॅन्सरला हरवलं, गोड मुलाचे शाळेत जंगी स्वागत, चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी भावुक
मुलाचे अशा प्रकारे स्वागत करण्यात आले.
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 10:09 PM

मुंबई : माणसाचं आयुष्य हे मोठं गुंतागुतीचं आहे. आपल्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी कधी आपल्यासमोर अनपेक्षित असे संकट उभे राहते तर कधी दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागते. आजाराशी सामना करताना जो व्यक्ती धाडस तसेच हिम्मत न हारता उपचार घेतो, तो जिवंत राहतो. मात्र मानसिक खच्चिकरण झालं की आजारामुळे कमी आणि चिंतेनेच आपण कमकुवत व्हायला लागतो. या सर्व ठोकताळ्यांना एक छोटासा मुलगा मात्र अपवाद ठरला आहे. या छोट्याशा मुलाने कॅन्सरवर मात केली आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर या छोट्या मुलाचे त्याच्या मित्रांनी जंगी स्वागत केले आहे. (cute boy welcomed by his friends who defeated cancer see viral video)

मुलाने कॅन्सवर मात केली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ अतिशय उत्साहवर्धक आणि प्रेरणा देणारा आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसतोय. हा मुलगा चक्क कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन आला आहे. त्याला कॅन्सरने ग्रासले होते. या रोगावर योग्य उपचार घेऊन तो आपल्या शाळेत परतला आहे. शाळेत परतल्यानंतर त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

मित्रांनी शाळेत केलं जंगी स्वागत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसत आहे. अतिशय गोड असलेला हा छोटा मुलगा चालत येतोय. त्याच्या दोन्ही बाजूने त्याचे वर्गमित्र उभे आहेत. कॅन्सरला हरवून आलेल्या छोट्या मुलाने प्रवेश करताच उभी राहिलेली सारी मुलं आनंदात टाळ्या वाजवत आहेत. तसेच हर्षोल्हासित होऊन त्याचे स्वागत करत आहेत. असे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत होत असल्याचे पाहून हा छोटा मुलगा हरखून गेला आहे. तो आनंदात आपल्या मित्रांच्या मधून चालत आहे. तसेच समोर जाताच एका महिलेने त्याला प्रेमाने जवळ घेतले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. काही नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी छोट्या मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केलीय. काही नेटकऱ्यांनी तर या हिडीओला शेअरसुद्धा केल आहे. हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर Buitengebieden या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद

Video | भरधाव वेगात रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न, फाटकाला आदळून मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: टब शिंगावर घेऊन म्हशीची कलाकारी, लोक म्हणाले, ‘हिच्यापुढे फूटबॉल प्लेअरही फेल’

(cute boy welcomed by his friends who defeated cancer see viral video)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.