भारतात साजरा केला जातो लाडक्या सुनेसाठी “सुनबाई दिवस”!
सासू सुनेमध्ये चांगले आणि मधुर नाते प्रस्थापित व्हावे म्हणून हा दिवस सुनबाई दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.
जगभरात अनेक प्रकारचे खास दिवस साजरे केले जातात. कधी फादर्स डे, कधी मदर्स डे आणि इतर अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. पण खास सुनेसाठी कधी कुठला दिवस साजरा केला जात नाही. आपल्याकडे तर जावयासाठी खास धोंड्याचा महिना सुद्धा असतो. पण सुनाबाईंसाठी काय असं काही खास नसतं. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात याची सुरुवात झालीये. तिथे १ ऑक्टोबर हा खास “सुनबाई दिवस” म्हणून साजरा केला जातोय.
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील महिलांनी 1 ऑक्टोबर हा सुनबाई दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम 2021 मध्ये सुरू करण्यात आला. यावर्षी सुद्धा हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलाय.
सासू सुनेमध्ये चांगले आणि मधुर नाते प्रस्थापित व्हावे म्हणून 1 ऑक्टोबर हा दिवस सुनबाई दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.
सासू-सुनेने आई-मुलीसारखे मधुर नाते प्रस्थापित करावे या विचाराने राजगडच्या लाल चुनार संस्थेने हा उपक्रम सुरू केल्याचे इथल्या स्थानिक महिलांचे म्हणणे आहे.
“सुनबाई दिवस” हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व महिला, सासू, सून एकमेकींना फुले देऊन मिठी मारतात.
याशिवाय सासू तर्फे सुनेसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केक कापला जातो. कापण्यात आला होता. या काळात सासूसोबतच्या सुनेने सांगितले की, सासूने त्यांच्यासाठी एवढा विचार केला आणि सुनेला 1 ऑक्टोबरचा विशेष दर्जा दिला याचा खूप आनंद झाला आहे.