Delhi Metro मध्ये तुमचं स्वागत आहे, टशनमध्ये बिडी फुकणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल

हा म्हातारा माणूस अगदी कशाचीही परवा न करता मस्त बिडी ओढतोय. याची बसण्याची स्टाईल सुद्धा वेगळी आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलीये. काहींनी तर दिल्ली मेट्रो आणि डीसीपीला टॅग केलंय आणि कारवाईची मागणी केलीये. "नाचणं-गाणं ठीक आहे पण यामुळे इतर लोकांना त्रास होतोय"असं लोकं म्हणतायत.

Delhi Metro मध्ये तुमचं स्वागत आहे, टशनमध्ये बिडी फुकणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ व्हायरल
delhi metro smoking
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 12:40 PM

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोमधील आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. इथून मागेही आपण असे बरेच व्हिडीओ पाहिलेत. कधी यात लोकं डान्स करतात, कधी गाणं म्हणतात तर कधी अजून काही करतात. दिल्ली मेट्रो बाकी गोष्टी सोडा पण या व्हिडीओमुळेच जास्त फेमस व्हायला लागलीये. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक या व्हिडिओचं कौतुक करतात तर काही यावर टीका करतात. जसा व्हिडीओ असेल तशी लोकांची प्रतिक्रिया असते. बरेचदा तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण कारवाई करण्याची सुद्धा मागणी करतात. दिल्ली मेट्रो मधील व्हिडीओ दर आठवड्याला व्हायरल होतंच असतात आता तर हा ट्रेंडच झालाय. व्हायरल व्हिडीओ मध्ये एक तरी व्हिडीओ हा दिल्ली मेट्रोमधला असतो.

कशाचीही परवा न करता…

हा व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एक म्हातारा माणूस बिडी ओढतोय. हा इतक्या टशनमध्ये बिडी ओढतोय की बास्स! मेट्रोमध्ये बिडी, सिगारेट अशा गोष्टींना परवानगी नाही हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण हा म्हातारा अगदी कशाचीही परवा न करता मस्त बिडी ओढतोय. याची बसण्याची स्टाईल सुद्धा वेगळी आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलीये. काहींनी तर दिल्ली मेट्रो आणि डीसीपीला टॅग केलंय आणि कारवाईची मागणी केलीये. “नाचणं-गाणं ठीक आहे पण यामुळे इतर लोकांना त्रास होतोय”असं लोकं म्हणतायत.

स्वतःच्याच धुंदीत

मेट्रो लोकांनी भरलेली आहे. हा म्हातारा माणूस एका ठिकाणी बसलाय. या माणसाचा व्हिडीओ एकजण कुणीतरी शूट करतंय. हा वयस्कर स्वतःच्याच धुंदीत आहे. मेट्रोमध्ये परवानगी आहे नाहीये. कारवाई होऊ शकते किंवा आजूबाजूची लोकं काहीतरी म्हणू शकतात यातलं काहीच या माणसाच्या मनात येत नाही. हा माणूस मस्त आपल्या सीटवर बसून बॉक्स मधून बिडी बाहेर काढतो, ती जाळतो आणि फुकत बसतो. आजकालची तरुण मुलं सुद्धा इतकं टशन दाखवत नसतील असं या बाबाचं टशन आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.