Mukesh Ambani Diwali Gift: मुकेश अंबानी यांनी दिले असे दिवाळी गिफ्ट, कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ काढून केला शेअर

Mukesh Ambani Diwali Gift: मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबातील इतर सदस्य आकाश, श्लोका, ईशा, आनंद, अनंत, राधिका आणि मुकेश अंबानी यांच्या चार नातवंडांनीही एका कार्डमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Mukesh Ambani Diwali Gift: मुकेश अंबानी यांनी दिले असे दिवाळी गिफ्ट, कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ काढून केला शेअर
Mukesh Ambani Diwali Gift
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 5:25 PM

Mukesh Ambani Diwali Gift: रिलायन्स समूह भारतातील मोठा उद्योग समूह आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहे. त्यांच्या जीवनशैलीची चर्चा माध्यमे अन् सोशल मीडियामध्ये सातत्याने होत असते. अनंत अंबानी यांच्या लग्नातील गिफ्टनंतर रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. या दिवाळी गिफ्टचा व्हिडिओ काढून कर्मचाऱ्यांनी शेअर केला आहे. या दिवाळी गिफ्टमध्ये काजू, बदाम, किसमिसचे पॅकेट आहे.

काय दिले गेले गिफ्ट

रिलायन्स कंपनीकडून देण्यात आलेल्या गिफ्टसंदर्भात दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाचा बॉक्स दिसत आहे. त्यावर “दीपावली शुभकामनाएं” आणि “शुभ दीपावली” लिहिले आहे. तसेच बॉक्सच्या झाकनावर भगवान गणरायाची प्रतिमा आहे. बॉक्सच्या आत एक पांढऱ्या रंगाची पिशवी आहे. त्याची थीम “वंतारा” आहे. अनंत अंबानी यांच्या वाइल्डलाइफ रिट्रीट प्रोजेक्टपासून ती घेतली आहे. या बॉक्समध्ये मनुके, काजू आणि बदाम ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

कुटुंबियांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि कुटुंबातील इतर सदस्य आकाश, श्लोका, ईशा, आनंद, अनंत, राधिका आणि मुकेश अंबानी यांच्या चार नातवंडांनीही एका कार्डमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडिओला अनेक लाईक

इंस्टाग्राम युजरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जिओ कंपनीकडून दिवाळीची भेट. या व्हिडिओला 1.6 मिलियन पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिले आहे. अंबानी परिवाराकडून देण्यात आलेल्या या गिफ्टमुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट अन् लाईकसुद्धा केले आहे. रिलायन्सने दिलेल्या या भेटवस्तूमुळे कर्मचाऱ्यांच्या हृदयात अंबानी कुटुंबाप्रती प्रेम अधिक वाढले आहे. यापूर्वी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना अनंत अंबानी यांच्या लग्नाचे गिफ्ट मिळाले होते. त्या गिफ्टची चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.