Viral video| हिरो बनून कुत्र्याने वाचवले हरणाचे प्राण; लोकांकडून श्वानाच्या शौर्याचे कौतुक

कुत्र्यांची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते, सोबतच ते आपल्या मालकांप्रती अत्यंत निष्ठावान देखील असतात. हा प्राणी खऱ्या अर्थाने मानवाचा मित्र आहे. श्वानाचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या श्वानाचे कौतुक केले आहे.

Viral video| हिरो बनून कुत्र्याने वाचवले हरणाचे प्राण; लोकांकडून श्वानाच्या शौर्याचे कौतुक
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:33 PM

कुत्र्यांची (dog) गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते, सोबतच ते आपल्या मालकांप्रती अत्यंत निष्ठावान देखील असतात. हा प्राणी खऱ्या अर्थाने मानवाचा मित्र आहे. कुत्रे आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सध्या सोशल मिडीयावर (Social media) असाच एक कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ( video) पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल की, कुत्रा हा प्राणी पाळण्याचे सर्वाधिक प्रमाण का आहे ते?  व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा कुत्रा एका हरणाच्या बाळाला वाचवताना दिसत आहे. हरणाला वाचवण्यासाठी तो त्याला तोंडाने पकडतो आणि किनाऱ्यावर उभ्या असलेल्या मित्राकडे घेऊन जातो. बचावादरम्यान, कुत्र्याने हरणाला तोंडात पकडले, जसे तो आपल्या पिल्लांना तोंडाने धरून उचलतो. तसेच त्याने या हरणाच्या पिल्लाला उचलले आहे.

कुत्र्याने वाचवले हरणाचे प्राण

हा कुत्रा पाण्यात पडलेल्या हरणाच्या पिल्लाला वाचवताना दिसत आहे. यामध्ये त्याने हरणाच्या पिल्लाला आपल्या तोंडात पकडले आहे. कुत्रा या हरणाला पाण्यातून बाहेर काढताना दिसत आहे. हरणाच्या पिल्लाला बाहेर काढताना तो त्याला आपल्या पिल्लांप्रमाणेच तोंडात पकडून बाहेर काढत आहे. मात्र याचदरम्यान त्याला आपले दात लागणार नाहीत याची देखील तो काळजी घेत आहे. हा व्हिडीओ सोशोल मीडियावर प्रचंड व्हायरलं झाला असून, नेटकऱ्यांकडून या कुत्र्याचे कौतुक होत आहे.

नेटकरी म्हणतात…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, युजर्सकडून या कुत्र्याचे कौतुक होत आहे. @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 25 हजारांहून अधिक लाईक्स, 2.8 हजारांहून अधिक रिट्विट्स आणि 13 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सनी या कुत्र्याचे जोरदार कौतुक केले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘आयला!  हा कुत्रा तर हिरो निघाला.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘या कुत्र्याने चमत्कार केलाआहे.’

संबंधित बातम्या

Video| ‘हा’ पोपट काढतो आयफोनच्या रिंगटोनचा हुबेहूब आवाज, नेटकरी म्हणतात फोनची रिंग वाजल्याचा भास होतो

‘दिल दे दिया है, किडनी भी देंगें तुझे सनम!’ पण किडनी घेऊन बयेचा दुसऱ्यासोबतच छैय्या छैय्या

लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.