Earthquake Video: अरे बच्चे बच्चे मन के सच्चे! चीनमध्ये भूकंप, व्हिडीओ वायरल आणि मुलांवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडिओ समोर आल्यावर आता नेटकरी मुलांचे कौतुक करताना थकत नाहीयेत.नेटकरी या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडिओनुसार, चीनमधील शिमियन काउंटीमध्ये 20 मे रोजी 4.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Earthquake Video: अरे बच्चे बच्चे मन के सच्चे! चीनमध्ये भूकंप, व्हिडीओ वायरल आणि मुलांवर कौतुकाचा वर्षाव
अरे बच्चे बच्चे मन के सच्चे!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:55 PM

सोशल मीडियावर (Social Media) रोज हजारो व्हिडीओज समोर येत असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे लोकांची मनं जिंकतात. असाच एक व्हिडिओ चीनमधील सिचुआन काउंटीमधून (China Sichuan Viral Video) समोर आलाय. खरंतर इथे भूकंप (Earthquake) झाला होता, त्यानंतर शाळेच्या क्लासमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिव्यांग वर्गमित्राला कसं वाचवलं, एवढ्या अटीतटीच्या वेळी सुद्धा त्यांनी जसेच्या तसे बाहेर काढले. व्हिडीओ बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल.

एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि ट्विटरवर हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. एका शाळेत क्लास सुरू आहे. वर्गात अनेक मुले अभ्यास करताना दिसतायत. याच वर्गात एक दिव्यांग विद्यार्थी व्हीलचेअरवर बसलेला दिसतो. त्याचवेळी भूकंप होतो. यानंतर सगळी मुलं वर्ग सोडून बाहेरच्या बाजूला पळू लागतात. सगळे गोंधळतात कुणाला काहीही सुचत नाही, सगळे पळू लागतात अर्थातच जीवाची पर्वा सगळ्यांना असते. पण इतक्या अटीतटीच्या वेळी सुद्धा क्लास मधली मुलं त्या दिव्यांग मित्राला विसरत नाहीत. ते त्या आपल्या मित्राजवळ जातात आणि त्यालाही आपल्यासोबत बाहेर काढतात.

हे सुद्धा वाचा

नेटकरी या व्हिडिओच्या प्रेमात

व्हिडिओ समोर आल्यावर आता नेटकरी मुलांचे कौतुक करताना थकत नाहीयेत. नेटकरी या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. व्हिडिओनुसार, चीनमधील शिमियन काउंटीमध्ये 20 मे रोजी 4.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या क्लासमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आपण पाहू शकता की काही विद्यार्थी व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग वर्गमित्राला मदत करत आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पाहा व्हिडिओ –

नॉर्वेच्या माजी मुत्सद्दी एरिक सोलहाइमने शेअर केला व्हिडिओ

हा व्हिडिओ नॉर्वेजियनचे माजी मुत्सद्दी एरिक सोलहाइम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सॉलिडॅरिटी! 20 मे रोजी शाळेत 4.8 तीव्रतेच्या सिचुआन भूकंपादरम्यान, शिक्षक आणि वर्गमित्र तिला व्हीलचेअरवर विसरले नाहीत.” व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्स मुलांचे भरभरून कौतुक करत आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.