भोळा माणूस, तिकडे काकू लाजल्या ना! गाडीला हार घालायला सांगितला होता आणि काय केलं…
क्लिपमधील लोकांच्या संभाषणाची भाषा मराठी आहे. त्यामुळे हा किस्सा महाराष्ट्रातलाच असावा असा अंदाज आहे.
सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहायला मिळतोय. मात्र, व्हिडिओच्या लोकेशनबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण क्लिपमधील लोकांच्या संभाषणाची भाषा मराठी आहे. त्यामुळे हा किस्सा महाराष्ट्रातलाच असावा असा अंदाज आहे. एक माणूस आपल्या पत्नीसोबत नवीन मोपेड खरेदी करायला गेला होता, शोरूमच्या लोकांनी नवीन मोपेड घालण्यासाठी हार दिला, तेव्हा त्या माणसाने तो हार आपल्या पत्नीला घातला. पुढे काय झालं ते पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. हा व्हिडीओ, यातला माणूस खूपच निरागस आहे.
हा व्हिडिओ ट्विटर हँडल @yogitabhayana ने 13 ऑक्टोबर रोजी शेअर केला होता. “तुम्हीही बघा साफ मन असणारे, भोळे लोक” असं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देण्यात आलंय.
या क्लिपला 40,000 हून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 3,000 लाईक्स मिळाले आहेत. तसेच, यावर शेकडो युझर्सनी प्रतिसाद नोंदवला आहे.
हे टू-व्हीलरचं शोरूम आहे. एक वयस्कर जोडपं नवीन मोपेड विकत घेतात. या आनंदाच्या प्रसंगी शोरुम मॅनेजर आधी त्या व्यक्तीच्या पत्नीला मोपेड जवळ उभे राहून फोटो काढायला सांगतो.
मग त्या व्यक्तीला नवीन बाइकला घालण्यासाठी हार देतो. पण हा माणूस इतका भोळा असतो, या भोळ्या भाबड्या पुरुषाला असं वाटतं की हा हार बायकोलाच घालायचाय.
आप भी देख लो,मन के साफ भोले भाले लोग !! pic.twitter.com/rifDpnqyZg
— Yogita Bhayana योगिता भयाना (@yogitabhayana) October 13, 2022
“प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री असते”, “अशी साधी माणसे आहेत म्ह्णूनच पृथ्वी आहे” अशा कमेंट्स लोकांनी या व्हिडिओवर केल्यात.
हे पाहून शोरुम मालक लगेच तो हार मोपेडला घालायचाय असं सांगतो. पुरुषाचा हा निरागसपणा पाहून बायकोसह शोरुम मधली इतर लोक हसू लागतात. हा व्हिडिओ बघून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल हे नक्की.