मुलगा असावा तर असा, आधुनिक श्रावण बाळाचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलागा आपल्या आईची काळजी घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या मुलांना आधुनिक श्रावणबाळ असे म्हटले आहे.
Viral Videos : त्रेता युगमधील श्रावणबाळाची (Shravanbal) गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती असेल. या कथेनुसार असे माणण्यात येते की, हा श्रावणबाळ मातृ-पितृ भक्त होता. तो आपल्या आई वडिलांची (parents) प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. तो त्यांची प्रत्येक गजर पूर्ण करायचा. त्याचे आई-वडील हे अंध होते. तो आपल्या आई-वडिलांना आंघोळ घालायचा. त्यांच्यासाठी जेवन तयार करायचा. त्यांना आपल्या हाताने खाऊ घालायचा. त्यानंतर त्यांची सेवा देखील करायचा. एवढेच नाही तर तो आपल्या आईवडिलांना कावडीमध्ये घेऊन तिर्थयात्रेला देखील निघाला होता. मात्र आजच्या जमान्यामध्ये शोधूनही आसा मुलगा सापडणार नाही. मात्र असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) झाला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती अगदी श्रवणबाळाप्रमाणेच आपल्या आईची काळजी घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. नेटकरी या अधुनिक श्रावणबाळाचे कौतुक करत आहेत.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आपल्या आईला थंडी वाजते म्हणून, डोक्याला स्कार्फ बांधत आहे. त्याची आई म्हतारपणामुळे डोक्याला स्कार्फ बांधू शकत नाही. ती स्व:ता स्कार्फ बांधण्याचा प्रयत्न करते. मात्र तीला स्कार्फ बांधता येत नाही. त्यानंतर तिचा मुलगा त्या वृद्ध स्त्री जवळ जातो आणि तिला स्कार्फ बांधून देतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकरी या मुलाचे कौतुक करत आहेत.
5 सेंकदात 5 हजार लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला समर्पक कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना मुलगा पाहिजे तर असा, श्रावणबाळासारखे काही मुलं आजही या जगात आहेत हे पाहून आनंद झाला. प्रत्येक घरात जर असा मुलगा असता तर आई वडिलांना वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडली नसती, असे कॅप्शन काबरा यांनी आपल्या या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, पाच सेंकदामध्ये या व्हिडीओला पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे.
आधुनिक श्रावण बाळ
बेटा हो तो ऐसा…
ख़ुशी होती है देखकर कि श्रवण कुमार जैसे पुत्र आज भी हैं…
काश हर घर में ऐसे बेटे हों ताकि समाज को कभी वृद्धाश्रमों की ज़रुरत ना पड़े. pic.twitter.com/iUugis5p9C
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 8, 2022
संबंधित बातम्या
संगीत ऐकणारा हत्ती पाहिलात का? हत्ती पाहून नेटकरी म्हणतात…
Viral Saree : साडी तर बनवली, पण ती नेसून कुठे फिरणार? ‘हा’ अजब Video पाहून यूझर्स करतायत सवाल