Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर दोन भावांची भेट होत आहे. व्हिडीओतून मिळत असलेल्या माहितीनुसार हे दोन्ही भाऊ भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी विभक्त झाले होते. त्यानंतर तब्बल 74 वर्षांनी या दोन भावांची भेट झाली आणि गळाभेट घेतल्यानंतर हे दोन्ही भाऊ ढसाढसा रडले.

Video : फाळणीनं तोडलं... नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे
कर्तारपूर कॉरिडॉरवर 74 वर्षांनी दोन भावांची भेट
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 11:47 PM

नवी दिल्ली : भैय्या हमारे बीच की ये दीवार तुटती क्यूं नहीं हे, असं म्हणणारे बोमन इराणी तुम्हाला लगेच आठवले असतील. आठवायलाच हवेत. कारण अंबुजा सिमेंट सारखीच एक भयंकर भिंत दोन भावांच्या नात्यात उभी ठाकली होती. या भींतीचं नाव होतं फाळणी! पण कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर (Kartarpur Corridor) फाळणीची ही भिंत कोसळली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी (India-Pakistan Partition) विभक्त झालेले दोन भाऊ तब्बल 74 वर्षानंतर भेटल्याचा हा व्हिडीओ आहे. कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर या दोन भावांची भेट झाली आणि या गळाभेटीनंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा आपसूक पाणावल्या!

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर दोन भावांची भेट होत आहे. व्हिडीओतून मिळत असलेल्या माहितीनुसार हे दोन्ही भाऊ भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी विभक्त झाले होते. त्यानंतर तब्बल 74 वर्षांनी या दोन भावांची भेट झाली आणि गळाभेट घेतल्यानंतर हे दोन्ही भाऊ ढसाढसा रडले. या दोन भावांची भेट पाहून उपस्थित लोकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. हा व्हिडीओ इतका भावूक आहे की तो पाहून लोकही भावूक होत आहेत. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि भावनिक कमेंट्सही करत आहेत.

दोन्ही भावांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली!

पाकिस्तानी मीडिया हाऊस एआरवॉय न्यूजच्या रिपोर्टनुसार, 80 वर्षाचे मोहम्मद सिद्दीकी पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात राहतात. ते फाळणीवेळी आपल्या परिवारापासून वेगळे झाले. त्यांचे भाऊ हबीब उर्फ शेला भारतात पंजाबमध्ये राहतात. कर्तारपूर साहेब कॉरिडॉरवर तब्बल 74 वर्षानंतर नियतीने ही भेट घडवून आणली. या भेटीनंतर या दोन्ही भावांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

हजारो लाईक्स आणि भावनिक कमेंट्स

दोन भावांच्या नात्याचं पावित्र्य सांगणारा हा व्हिडीओ @Gagan4344 नावाच्या ट्विटर यूजरने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. एका युजरने कमेंटमध्ये हा व्हिडीओ खरच हृदयस्पर्शी असल्याचं म्हटलंय. तर एकाने रडायला लावणारा व्हिडीओ असल्याचं म्हटलंय.

इतर बातम्या :

‘सरनाईकांवर कृपादृष्टी, परबांंचं रिसॉर्ट अधिकृत कधी होणार? मग नार्वेकरांवर अन्याय का?’, किरीट सोमय्यांचा घणाघात

Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.