Video: साडेचार कोटीच्या ‘लॅम्बॉर्गिनी’च्या बोनटवर ठेऊन कार्तिक आर्यनकडून स्ट्रीट फूडचा आस्वाद, कार्तिकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून कार्तिकला चायनिज खाताना पाहू शकता. तेवढ्यात स्ट्रीट फूडचालक त्याच्यासाठी आणखी काहीतरी घेऊन येतो, आणि ते त्याच्या नव्या कोऱ्या लॅम्बोर्गिनी या गाडीच्या बोनटवर ठेवतो.

Video: साडेचार कोटीच्या 'लॅम्बॉर्गिनी'च्या बोनटवर ठेऊन कार्तिक आर्यनकडून स्ट्रीट फूडचा आस्वाद, कार्तिकच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक
लॅम्बॉर्गिनीच्या बोनेटवर चायनिज ठेऊन खाणारा कार्तिक आर्यन
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 12:51 PM

मुंबई: अनेकदा तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींना पंचतारांकित कॅफे, रेस्टॉरंटच्या बाहेर पाहिले असेल, जिथं ते त्यांच्या मित्रांसोबत लंच किंवा डिनर करताना दिसतात. पण जेव्हा एखादा बी-टाउन अभिनेता एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर गाडी चालवून स्ट्रीट फूडचा आनंद घेतो तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असेल? होय, तुम्ही ते बरोबर वाचलंय, सध्या कार्तिक आर्यनचा रस्त्याच्या कडेला चायनीज फूडचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ( Famous bollywood actor kartik aryan enjoy chinese Street food on his lamborghini video viral Bollywood Celebs )

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून कार्तिकला चायनिज खाताना पाहू शकता. तेवढ्यात स्ट्रीट फूडचालक त्याच्यासाठी आणखी काहीतरी घेऊन येतो, आणि ते त्याच्या नव्या कोऱ्या लॅम्बोर्गिनी या गाडीच्या बोनटवर ठेवतो. इतक्या महागड्या गाडीच्या बोनटवर ठेऊन कार्तिक चायनिजचा आस्वाद घेत आहे, त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही आहे, ज्या फूड कंटेनरमधीलही काही फूड कार्तिक खाण्यासाठी घेतो. बॉलीवूडच्या यशशिखरावर पोहचल्यानंतरही कार्तिकची ही कृती त्याला जमिनीशी जोडून ठेवते.

व्हिडीओ पाहा

बिगबॉसमध्ये धमाकाच्या प्रमोशननंतर चायनिजचा आस्वाद

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, धमाका या नव्या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन बिगबॉसमध्ये गेला होता. सलमान खानसोबत त्याने या वेबसीरिजचं प्रमोशन केलं. त्यानंतर परतताना कार्तिक मुंबईतील जुहूच्या एका चायनिज कॉर्नरवर थांबला. आणि इथंच त्याने रस्त्यावर उभं राहून चायनिजचा आस्वाद घेतला.

कार्तिकच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक

सोशल मीडियावर सगळेच कार्तिकच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ‘कार्तिक जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच तो एक चांगला माणूस आहे. तर दुसऱ्याने लिहिले – ‘कार्तिक इतर अभिनेत्यांसारखा नाही जे लहान दुकानांना अस्वच्छ मानतात. ‘ आणखी एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘स्ट्रीट फूडसमोर फाइव्ह स्टार फूड फेल झालं आहे.’ बॉलिवूड सेलेब्स अनेकदा फाइव्ह स्टार हॉटेल, कॅफे किंवा रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट केले जातात, तर दुसरीकडे, कार्तिकला असं जेवताना पाहून रस्त्याच्या कडेला, चाहते त्याच्यावर मनापासून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

तब्बल साडेचार कोटींची आलिशान लॅम्बॉर्गिनी कार

अलीकडेच, कार्तिक आर्यनने एक अतिशय महागडी लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे, जिची किंमत देखील सुमारे 4.5 कोटी रुपये आहे. कार्तिक सध्या राम माधवानी दिग्दर्शित ‘धमाका’मध्ये एका टेलिव्हिजन पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. हा एक पॉलिटिकल थ्रिलर ड्रामा आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत मृणाल ठाकूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मृणाल कार्तिकच्या मैत्रिण आणि सह रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये त्याच्या अभिनयासोबतच लुक्सलाही खूप दाद मिळाली. राम माधवानी हे आपल्या अभिनेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणण्यासाठी ओळखले जातात. कार्तिकच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक असेल असं दिसते.

हेही पाहा:

Video: तरुणीची ‘मगर’मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.