Viral News: मुलीचे लग्न आठवड्याभरात करायचं, बापाने केले ओपन चॅलेंज

सोशल मीडियावरील या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ६५ हजारापेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांना हा प्रकार बनाव असल्याचे वाटत आहे. कारण त्या मुलीच्या मांगमध्ये आधीच सिंदूर दिसत आहे. या व्हिडिओत एका कोणीतरी त्या बापाला प्रश्न विचारत आहे.

Viral News: मुलीचे लग्न आठवड्याभरात करायचं, बापाने केले ओपन चॅलेंज
या बापाने मुलीशी लग्न करण्याचे चॅलेंज दिलेय
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 9:54 AM

सोशल मीडियाची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट केल्या जातात. त्यात वेगवेगळे दावे केले जातात. त्यातील काही पोस्ट ट्रोल होतात. परंतु एक अनोखी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात बापाने आपल्या मुलीशी सात दिवसांत लग्न करण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. ‘शादी करने वाली गर्ल’ या नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला आहे. त्यात अनेक कॉमेंट आल्या आहेत. अनेकांना हा सर्व प्रकार बनाव वाटत आहे.

काय आहे व्हिडिओत

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत एक बाप आपल्या मुलीसोबत एका चारचाकी गाडीसमोर दिसत आहे. त्याच्या हातात चेकबूक आहे. त्यात वडील म्हणतात, माझ्या मुलीशी सात दिवसांत लग्न करणाऱ्यावर व्यक्तीला ब्लँक चेक देईल. त्याने आपल्या हाताने रक्कम भरुन टाकावी. त्या व्यक्तीचा भंगार विक्रीचा व्यवसाय असल्याचे तो म्हणताना दिसत आहे. आपल्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही, असा दावा हा व्यक्ती करत आहे.

हे सुद्धा वाचा

यामुळे जो आपल्या मुलीशी लग्न करेल, तो मालामाल होऊन जाईल, असे त्याने म्हटले आहे. या व्हिडिओच्या शेवटी तो बाप मुलीच्या डोळ्यातील आश्रू पुसताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओत मुलगी मान खाली करुनच उभी असलेली दिसत आहे.

व्हिडिओ होतोय ट्रोल

सोशल मीडियावरील या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ६५ हजारापेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांना हा प्रकार बनाव असल्याचे वाटत आहे. कारण त्या मुलीच्या मांगमध्ये आधीच सिंदूर दिसत आहे. या व्हिडिओत एका कोणीतरी त्या बापाला प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे तो देत आहे. हरियाणामधील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. कारण त्या चारचाकी गाडीचा क्रमांक hr ने सुरु होत आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.