IPS च्या घरी पाणी भरत होती फायर ब्रिगेडची गाडी? व्हायरल व्हिडिओचे सत्य पोलिसांनी सांगितले…

डेहराडूनचे 1993 च्या बॅचचे रहिवासी असलेले अर्चना त्यागी सध्या महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. धडाकेबाज पोलीस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला राणी मुखर्जीचा 'मर्दानी' हा चित्रपट त्याच्यावर आधारित आहे.

IPS च्या घरी पाणी भरत होती फायर ब्रिगेडची गाडी? व्हायरल व्हिडिओचे सत्य पोलिसांनी सांगितले...
ips home
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 11:50 AM

महाराष्ट्र केडरच्या अधिकारी अर्चना त्यागी यांच्यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओनुसार, त्यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी पाणीच्या समस्या निर्माण झाली. त्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी पोहचली. संजय त्रिपाठी नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया X वर टाकला आहे. व्हिडिओ जुना असला तरी त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी सत्य समोर आणले आहे.

लोकांकडून कॉमेंट

घरात फायर ब्रिगेडची गाडी पाण्यासाठी आल्याचे पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत होते. फायर ब्रिगेडने घरी पाणी पुरवण्याचे काम सुरु केले का? असे येणार-जाणारे लोक म्हणताना दिसत आहे. घरातील टाक्या भरल्या जात आहे, कुठे आग लागली तर? असे बोलताना एक जण दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर डेहराडून पोलिसांनी प्रसिद्धसाठी पत्रक काढले आहे. त्यात व्हायरल व्हिडिओसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात पोलीस

एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी डेहराडून अग्निशमन अधिकाऱ्याकडून या घटनेची माहिती घेतली. त्यानुसार 15 जून रोजी गॅस गळतीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची टीम वाहनासह त्या ठिकाणी आली. त्यानंतर अग्निशमन दलाने स्वयंपाकघरात ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरवर पाणी टाकून गळती कमी केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्या घरात दोन वृद्ध लोक राहत होते.

कोण आहेत अर्चना त्यागी

डेहराडूनचे 1993 च्या बॅचचे रहिवासी असलेले अर्चना त्यागी सध्या महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. धडाकेबाज पोलीस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. 2014 मध्ये रिलीज झालेला राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट त्याच्यावर आधारित आहे. अर्चना त्यागी मूळच्या डेहराडून येथील आहे. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी पीजी-डीएव्ही कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून शिकवायला सुरुवात केली. यासोबतच यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली. त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) निवड झाली. महाराष्ट्र केडर मिळाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.