उडत उडत जाऊन घरोघरी फूड डिलिव्हरी! व्हिडीओ बघा विश्वास बसेल…

तुम्ही कधी विचार केला होता का की माणूस पक्ष्यासारखा उडत उडत फूड डिलिव्हरी करू शकतो? वाचून सुद्धा अशक्य वाटतंय ना?

उडत उडत जाऊन घरोघरी फूड डिलिव्हरी! व्हिडीओ बघा विश्वास बसेल...
Food delivery by flyingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 10:47 AM

तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की माणूस अक्षरशः त्याच्या जोरावर काहीही मिळवू शकतो. तंत्रज्ञान ही माणसाची निर्मिती आहे आणि माणूस हा प्रचंड हुशार प्राणी आहे. त्याच्या बुद्धिमत्तेला कसलीही सीमा नाही. माणसाला सगळंच शक्य आहे. हे वेळोवेळी सिद्ध होत गेलंय. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात माणूस काय काय करू शकतो याची कल्पना येते. होय! तुम्ही कधी विचार केला होता का की माणूस पक्ष्यासारखा उडत उडत फूड डिलिव्हरी करू शकतो? वाचून सुद्धा अशक्य वाटतंय ना? तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काहीही होऊ शकतं. व्हिडीओ बघून विश्वास बसेल.

सौदी अरेबियातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती एका मशीनच्या मदतीने एका इमारतीवरून हवेत उडून गेल्याचं पाहायला मिळतंय. तो फूड डिलिव्हरीसाठी आला होता असं दिसतंय.

खरंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय.अनेक युजर्सनी ट्विटरवर शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या एका मजल्यावर उडत उडत जाताना दिसतोय.

सौदी अरेबियातील एक डिलिव्हरी एजंट जेटपॅकवरून जेवण पोहोचवण्यासाठी उड्डाण करत असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर हा माणूस जेटपॅकवरून एका उंच इमारतीपर्यंत उडून मोठ्या पाकिटात आपल्यासोबत काहीतरी घेऊन जात असल्याचंही व्हिडिओत दिसतंय.

खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीने हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपकरणेही परिधान केली आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा गोंधळ उडालाय. असं तंत्रज्ञान सध्या खूप महागडं आहे.

फूड इंडस्ट्रीत कंपन्या आता अन्न पोहोचवण्याचे नवे मार्ग शोधू लागल्याचंही वास्तव आहे. काही कंपन्या रोबोट आणि ड्रोनच्या माध्यमातून अन्न पोहोचवत आहेत. त्याचवेळी अशा प्रकारे फूड डिलिव्हरी झाल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....