AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : फाडफाड इंग्रजी, कचरा वेचणाऱ्या आजींचं इंग्रजी ऐकून चकीत व्हाल!

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बंगळुरुमधील एक महिला सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

VIDEO : फाडफाड इंग्रजी, कचरा वेचणाऱ्या आजींचं इंग्रजी ऐकून चकीत व्हाल!
woman speaking english
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : साधारणत: लोकांचं राहणीमान, चेहरा पाहून त्याची ‘औकात’ ठरवली जाते. मात्र ते अत्यंत चुकीचं आहे. माणसाला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. रंग-रुप, कपडे, राहणीमान पाहून त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवणं अयोग्य आहे. कारण अनेकवेळा आपलं तसं वागणं हे आपलं अज्ञान दाखवणारं ठरू शकतं. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बंगळुरुमधील एक महिला सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

ही महिला कचरा वेचते. कचरा वेचणाऱ्या महिलेच्या भाषेवरुन सर्वजण अवाक् होऊन पाहात आहेत. ही महिला ज्या पद्धतीने इंग्रजी बोलते, ते चकीत करणारं आहे.

जपानमध्ये 7 वर्ष

इन्स्टाग्रावर हा व्हिडीओ itmeshachinaheggar या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला आपण 7 वर्षे जपानमध्ये काम केल्याचं सांगते. या व्हिडीओनुसार, संबंधित महिला सदाशिवनगरच्या आसपास कचरा वेचते. जपानमध्ये 7 वर्ष राहिल्यानंतर ती भारतात परतली. आपली कहाणी सांगत असताना ही महिला गाणेही गाते. तिने आपलं नाव Cecilia Margaret Lawrence सांगितलं.

या महिलेचा व्हिडीओ जगासमोर आणून चांगलं काम केलं आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

सचिन हेग्गरने या महिलेबाबत लिहिलं की अशा कहाण्या आपल्या आसपास असतात, केवळ आपण चारी दिशांनी उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं. या अद्भुत महिलेशी संपर्क करायला हवा. जर आपल्यापैकी कोणी या महिलेशी संपर्क करु इच्छित असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. @ceciliaed_always एक पेज आहे, यावर या महिलेचे मॉडेलिंगच्या रुपातील फोटो पाहायला मिळतील. हे या महिलेचं स्वत:चं पेज नाही, मात्र यावर अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

ज्या महिलेने या महिलेचा व्हिडीओ शूट केला, त्यावेळी ही इंग्रजी बोलणारी महिला कचरा वेचत होती, प्लास्टिक गोळा करत होती. हा कचरा, प्लास्टिक विकून जो पैसा मिळतो, त्यावर ती आपला खर्च भागवते.

दरम्यान, काही लोकांनी या महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठीही हा व्हिडीओ शेअर होत आहे.

संबंधित बातम्या

Video | चर्चेत येण्यासाठी स्पोर्ट बाईकवरुन स्टंटबाजी, मुंबई पोलिसांनी दाखवला इंगा, व्हिडिओ व्हायरल

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.