VIDEO : ना हेल्मेट, ना तोंडावर मास्क, नियमांची ऐशीतैशी, तरुणीची बाईकवर हात सोडून स्टंटबाजी

लोक प्रसिद्ध किंवा लोकप्रिय होण्यासाठी काय करतील याचा काहीच भरोसा नाही (Girl Stunts on bike video viral).

VIDEO : ना हेल्मेट, ना तोंडावर मास्क, नियमांची ऐशीतैशी, तरुणीची बाईकवर हात सोडून स्टंटबाजी
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 5:14 PM

मुंबई : लोक प्रसिद्ध किंवा लोकप्रिय होण्यासाठी काय करतील याचा काहीच भरोसा नाही (Girl Stunts on bike video viral). मात्र, प्रसिद्धी मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर करणं कधीही अंगलटी येऊ शकतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे गुजरातच्या सूरतमध्ये बाईकवर स्टंटबाजी करणारी संजना! रस्त्यावर चालताना अचानक गाडीचा वेग वाढवायचा, कधी एक हात पोटावर ठेवायचा तर कधी केसांवर, कधी एक हात सोडून गाडी चालवायची तर कधी दोन्ही हाथ सोडून गाडी चालवायची. अशा प्रकारच्या या स्टंटमुळे स्वत:चा जीव धोक्यात टाकायचाच त्याचबरोबर इतरांचाही जीव धोक्यात टाकला जातो. संजनाने अशाप्रकारच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनीदेखील कारवाई केली (Girl Stunts on bike video viral).

व्हारल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत रात्रीच्या वेळी रस्त्यावर तीन-चार गाड्या चालताना दिसत आहेत. संबंधिव व्हिडीओ कुणीतरी बाईकवरुन शूट करतोय. बाईक जसजसी पुढे जाते तसतसा कॅमेराही पुढे जातो. पुढे एक मुलगी स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसतेय. ती सुरुवातीला गाडी चालवताना एक हात खिशात ठेवते, नंतर पोटावर हात फिरवते, त्यानंतर दोघी हात सोडून तिच्या जॅकेटला हात लावते, त्यानंतर दोन्ही हातांमध्ये गाडीचा हॅण्डल पकडते आणि गाडीचा स्पीड प्रचंड वाढवते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालाय.

पोलिसांकडून दखल

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ हा गुजरातच्या सूरत शहरातील आहे. व्हिडीओतील संजना ही मुलगी बारडोली येथे वास्तव्यास आहे. ती सूरतमधीस डुम्मस भागात बाईक चालवण्यासाठी येते. ती तिच्या वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडीओ या ठिकाणी शूट करुन सोशल मीडियावर शेअर करायची. तिचे व्हिडीओ व्हायरल होत पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी संजना विरोधात कारवाई केली.

संजनाकडून कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन

विशेष म्हणजे संजनाच्या चेहऱ्यावर मास्क नाही. याशिवाय कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केली आहे.

पोलिसांनी कारवाई कशी केली?

पोलिसांनी व्हिडीओ बघितल्यानंतर या प्रकरणाचा तपासाला सुरुवात केली तेव्हा संजना चालवत असलेल्या बाईकचा नंबर हा बिलाल घांची नावाच्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर होता. पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा संजनाला फक्त बाईक चालवण्यासाठी दिली होती, अशी माहिती त्याने दिली. त्याच्यामार्फत पोलीस संजना पर्यंत पोहोचले. संजना फक्त बाईक चालवण्यासाठी सूरतला यायची. तिचं सध्या शिक्षण सुरु असून ती पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर तिला 3.27 लाख फॉलोअर्स आहेत.

व्हिडीओ बघाच:

View this post on Instagram

A post shared by _SANJU_ (@princi_sanju_99)

हेही वाचा : VIDEO : गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी, लोक भडकले, अर्ध मुंडन करुन गावात धींड, व्हिडीओ व्हायरल

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.