चक्क धावत्या रेल्वेत पाणीपुरीचा गाडा, “मुंबई लोकल आहे का ही?’ पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव
देशभरात गोलगप्पा खाण्याची आवड असणारे लोक आहेत. पण अनेकदा गोलगप्प्याशी संबंधित अतिशय गमतीशीर घटना समोर येतात. सध्या एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक मुलगा गोलगप्प्याचं दुकान लावून ट्रेनमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ ट्रेन मधला आहे.
मुंबई: गोलगप्पा हा भारतीयांच्या फार जवळचा विषय आहे. देशभरात गोलगप्पा खाण्याची आवड असणारे लोक आहेत. पण अनेकदा गोलगप्प्याशी संबंधित अतिशय गमतीशीर घटना समोर येतात. सध्या एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक मुलगा गोलगप्प्याचं दुकान लावून ट्रेनमध्ये उभा असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ ट्रेन मधला आहे. आजूबाजूला सर्व प्रवासी दिसत आहेत, गंमत म्हणजे अनेकजण गोलगप्पा खातानाही दिसले आहेत.
खरं तर हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. गोल गप्पे विकणाऱ्या मुलाकडे सर्व गोष्टी आहेत. गरम पाणी, गोड चटणी, चणा आणि पापडी देखील आहे. या मुलाचं दुकान पाहून ट्रेनमधून प्रवास करणारे लोक अवाक झाले.
गंमत म्हणजे ट्रेन किती वेगाने धावत आहे. पण मुलगा बेफिकीर होऊन लोकांना गोलगप्पा देतोय. हा व्हिडिओ केव्हा आणि कुठचा आहे, याबाबत सध्या ठोस माहिती मिळालेली नाही तरी लोक हा मुंबई लोकलचा असल्याचे सांगत आहेत. लोक हा व्हिडिओ देखील शेअर करत आहेत. इतकंच नाही तर लोक या मुलाच्या बिझनेस माइंडचं कौतुक करत आहेत आणि याला इनोव्हेशन म्हणत आहेत.
When you put your business mind on the right track pic.twitter.com/Wg3sQmEgpQ
— Sagar (@sagarcasm) June 21, 2023
काहींनी या मुलाचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर काहींनी ते व्हायरलही केले. मात्र यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले की, हे काम मुंबई लोकलमध्ये करता येणार नाही, या मुलावर कारवाई होऊ शकते. त्याचवेळी काही जण सांगू लागले की, मुलाने कोणतीही चूक केलेली नाही. हे तात्पुरते दुकान आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.