डिलिव्हरी बॉयचे धाडस बघून तुम्हीही कराल सलाम!

हा व्हिडिओ goodnews_movement नावाच्या अकाऊंटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले असून त्यावर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

डिलिव्हरी बॉयचे धाडस बघून तुम्हीही कराल सलाम!
lift dangerous video
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:07 PM

मुंबई: इंटरनेटच्या दुनियेत रोज काही ना काही नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण असे व्हिडिओ खूप कमी आहेत जे पाहिल्यानंतर आपण थक्क होतो. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल या जगात माणुसकी अजूनही शिल्लक आहे. जे लोक परिस्थितीमुळे घाबरतात आणि इतरांना मदत करण्याऐवजी स्वत:चा जीव वाचवण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक धडा आहे.

इतरांचे प्राण वाचवणारे आणि जगात आदर्श निर्माण करणारे काही लोक खऱ्या अर्थाने मसीहा असतात. अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात लिफ्टमध्ये एकटीच अडकलेली एक महिला आणि तिच्या मुलाला त्याने मदत केली. ही परिस्थिती अशी होती की इथे कोणीही घाबरून जाईल, पण इथे एका डिलिव्हरी बॉयने धाडस दाखवून समाजाला एक उत्तम उदाहरण दिले.

व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की एक डिलिव्हरी बॉय आई आणि मुलासोबत लिफ्टमध्ये दिसत आहे. या दरम्यान अचानक लिफ्ट काम करणे बंद करते. ज्यामुळे आई आणि बाळ प्रचंड घाबरलेले असतात, पण इथे डिलिव्हरी बॉय त्यांना सांभाळतो आणि दरवाजे उघडेपर्यंत आई आणि मुलाची काळजी घेतो. डिलिव्हरी बॉयचे धाडस पाहून जनता त्याला सलाम करत आहे.

हा व्हिडिओ goodnews_movement नावाच्या अकाऊंटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दोन लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले असून त्यावर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.