Video : 30 वर्षाचं नातं तुटलं… शेवटच्या दिवशी बसला मिठी मारली, ढसाढसा रडला, हात जोडले; ‘या’ ड्रायव्हरने का केलं असं?
एका बस चालकाचा नोकरीच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो बसला अलिंगन देताना दिसत आहे. तसेच बसकडे पाहून ढसाढसा रडतानाही दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओतून काही ना काही सांगण्याचा प्रयत्न केला जातो. काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका बस चालकाचा हा व्हिडीओ आहे. आपल्या शेवटच्या दिवशी त्याने चक्क बसला मिठी मारली. ढसढसा रडला आणि हात जोडून निघून गेला.
मदूरई जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. एक बसचालकर निवृत्त झाला होता. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्याने बसला मिठी मारली आणि तो रडला. त्यानंतर त्याने बसला हातही जोडले. 30 वर्षाची संगत सुटल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते. त्याचाच हा व्हिडीओ आहे. मुथुपंडी असं या बसचालकाचं नाव असल्याचं सांगितलं जातं. तो 60 वर्षाचा आहे. तो तिरुपरंगुंराम सरकारी बस वर्कशॉपमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
अश्रू तरळले
30 वर्ष तो ही बस चालवत होता. नोकरीला लागल्यापासून त्याच्या हातात हीच बस होती. त्यामुळे निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्याने बसला मिठी मारली. स्टेयरिंग व्हीलचं चुंबन घेतलं. बसला नमस्कार केला. त्यावेळी तो भावूक झाला. आता ही बस आपल्याला कधीच मिळणार नाही. या भावनेने त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि अचानक तो रडू लागला. त्याच्या सहकाऱ्यांनीही त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही अश्रू आवरता आवरेना. यावेळी मुथुपंडी यांच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी मुथुपंडी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कामाचं आणि सेवाभावी वृत्तीचं तोंडभरून कौतुक केलं.
View this post on Instagram
लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस
मुथुपंडी यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून कमेंटचा पाऊस पडत आहे. बसवरील त्याचं हे प्रेम पाहून अनेकजण भावूक होत आहेत. तसेच त्याला सॅल्यूटही करत आहेत. काहीजण त्याच्या सेवाभावी वृत्तीचं कौतुक होत आहे. तसेच या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळत असून हा व्हिडीओ सर्वचजण फॉरवर्ड करताना दिसत आहेत.