AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या आईने नवरदेवाला भर मंडपात चपलेने बदडले आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून तो उत्तर प्रदेशमधील हमीरपूर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल
MARRIAGE VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 5:05 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंमध्ये नवरी तसेच नवरदेवाची फजिती झालेली दाखवलेली असते. मात्र, सध्या एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या आईने नवरदेवाला भर मंडपात चपलेने बदडले आहे. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून तो उत्तर प्रदेशमधील हमीरपूर येथील असल्याचे सांगितले जात आहे. (Groom mother beating him in front of Bride video went viral on social media)

पुन्हा एकदा लग्न धुमधडाक्यात

मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये एक आंतरजातीय विवाह संपन्न होत आहे. काही दिवसांपूर्वी व्हिडीओतील तरुण तसेच तरुणीने कोर्टामध्ये जाऊन कायदेशीरीत्या लग्न केले होते. मात्र, आपल्या मुलीने लग्न केल्याचे समजताच या तरुणीच्या वडिलांनी दोघांचेही लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात लावण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तयारीसुद्धा करण्यात आली.

आईने नवरदेवालाच भर मंडपात चपलेने मारले

यावेळी नवरीच्या वडिलांनी लग्नासाठी मोठा खर्च केल्याचेही दिसते आहे. व्हिडीओमध्ये नवरी तसेच नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकत आहेत. मात्र, याचवेळी मोठा घोळ झाला आहे. व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या आईने नवरदेवालाच भर मंडपात चपलेने मारले आहे.

नवरदेवाला आईने का मारले ?

मिळालेल्या माहितीनुसार या आंतरजातीय विवाहामध्ये वराच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले नव्हते. नातेवाईकांनाच न बोलावल्यामुळे वराची आई खवळली होती. याच रागातून व्हिडीओतील आई नवरदेवाला चपलेने मारत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, भर मंडपात आईने नवरदेवाने मारायला सुरुवात केल्यामुळे सगळेच भांबावले होते. नवरदेवाची आई नवरदेवाला नेमकी का मारते आहे ? हे कोणालाही समजत नव्हते. प्रकरण चिघळत चालल्यामुळे लोक धावत आले आणि त्यांनी नवरदेवाला मार खाण्यापासून वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | समोर पाणी पाहताच हत्तीचे पिल्लू खुश, धम्माल मस्तीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO : वरमाला घालताच नवरदेवाचा पायजमा निसटला, पुढे काय झालं?; हा व्हायरल व्हिडीओ पाहाच!

Video | परवानगी न घेता पाणीपुरीवर ताव, तरुणाच्या कारनाम्यामुळे तरुणीचे बदलले हावभाव, पाहा व्हिडीओ

(Groom mother beating him in front of Bride video went viral on social media)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.