AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्न उरकून थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर, नव्या जोडीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या एक विशेष व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नव्याने लग्न केलेली एक जोडी मोठ्या थाटात पाणीपुरी खात आहे. पाणीपुरीचा आनंद लुटत असलेल्या या जोडीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

Video | लग्न उरकून थेट पाणीपुरीच्या ठेल्यावर, नव्या जोडीचा मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
BRIDE GROOM
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 7:59 PM
Share

मुंबई : पाणीपुरी हा एक असा पदार्थ आहे, ज्याचे जवळजवळ सगळेच दिवाने आहेत. खमंग आणि कुरकुरीत अशी पाणीपुरी खाण्यासाठी सगळेच आतूर असतात. ठेल्यावर मित्र मंडळी, मैत्रिणी जमून पाणीपुरीचा आनंद लुटतानाचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वी पाहत आलो आहोत. मात्र, सध्या एक विशेष व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नव्याने लग्न केलेली एक जोडी मोठ्या थाटात पाणीपुरी खात आहे. पाणीपुरीचा आनंद लुटत असलेल्या या जोडीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (Groom serves Golgappa Panipuri to his Bride video goes viral on social media)

आनंदात घेतायत पाणीपुरीचा आस्वाद

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नव्याने लग्न केलेली एक जोडी दिसत आहे. ही जोडी अजूनही लग्नाच्या कपड्यांमध्येच आहे. त्यांच्या गळ्यात अजूनही वरमाला तशाच आहेत. एकंदरीत त्यांच्या पेहरावावरुन या जोडीने नुकतंच लग्न उरकल्याचं वाटत आहे. लग्न उरकल्यानंतर ही जोडी थेट पाणीपुरीच्या दुकानात शिरली आहे. दुकानावर आल्यानंतर नवरदेव आपल्या बायकोला प्रेमाणे पाणीपुरी खायाला देत आहे. नवरीसुद्धा आपल्या नवरदेवाने भरवलेली पाणीपुरी प्रेमाने खात आहे. त्यानंतर कॅमेऱ्याकडे पाहून ही नवरी अतिशय प्रेमात हासत आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ?Annie ? (@arushi_rajput_10)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अजून समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ arushi_rajput10 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोबतच या व्हिडीओला मजेदार कॅप्शन दिलं आहे. ‘लग्न आपल्या जागेवर आणि पाणीपुरी आपल्या जागेवर’ असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे. पाणीपुरीचा आस्वाद घेतल्यानंतर नवरीचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. कदाचित यामुळेच या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ना लोकांची भीती, ना नवरीची चिंता, भर मंडपात तंबाखू खाणाऱ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

Video | पाण्यात व्यायाम करण्याचा महिलेकडून प्रयत्न, पण ऐनवेळी भलतंच घडलं, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | डोक्यावर पदर, अंगावर केशरी साडी, महिलेच्या ठुमक्यांनी नेटकरी घायाळ

(Groom serves Golgappa Panipuri to his Bride video goes viral on social media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.