गळ्यात वरमाला टाकली अन् बायकोचे थेट पाय धरले, नवरदेवाने असं का केलं ?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

एक तरुण समाजासमोर नवा आदर्श मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने लग्न झाल्यानंतर भर मंडपात आपल्या बायकोचे थेट पाय धरले आहेत. (groom touches feet of bride)

गळ्यात वरमाला टाकली अन् बायकोचे थेट पाय धरले, नवरदेवाने असं का केलं ?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
GROOM TOUCHES FEET OF BRIDE
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 9:16 PM

मुंबई : लग्न झाल्यानंतर मुलीचं संपूर्ण आयूष्य बदलून जातं. नवऱ्या मुलाच्या तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या भरभराटीसाठी ती आपलं सर्वस्व पणाला लावते. एवढं सारं करुनही अनेकवेळा तिच्या वाट्याला उपेक्षाच येते. अनेकवेळा तिला नवरा तसेच इतरांकडून अव्हेरलं जातं. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक नवरदेव फार चर्चेचा विषय ठरतो आहे, जो हे सगळं काही मोडीत काढून समाजासमोर एक नवा आदर्श मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. (Groom touches feet of his Bride in marriage program photo goes viral on social media)

त्याने लग्न झाल्यानंतर भर मंडपात आपल्या बायकोचे थेट पाय धरले आहेत. हा प्रसंग लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भर मंडपात आपल्या बायकोचे पाय धरणाऱ्या या नवऱ्या मुलाचे तोंडभरून कौतूक केले जात आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला फोटो हा नेमका कुठला आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, जो फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे, त्याचे कारण मात्र समजले आहे. सामान्यत: नवरा मुलगा आपल्या बायकोचे पाय धरत नाही. यात काही वावागे नसले तरी तसे करणे अनेकजण टाळतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला हृदयस्पर्षी फोटो डॉ. अजित वरवांडकर यांनी शेअर केला आहे. तसेच सलग चार ट्विट करत या फोटोबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर नवऱ्या मुलाने आपल्या बायकोचे थेट पाय धरले. या प्रसंगामुळे उपस्थित पाहुणे, वऱ्हाडी मंडळी तसेच नातेवाईक स्तब्ध झाले. या प्रकारानंतर नवऱ्या मुलाने असे का केले हे विचारण्यात आले. त्यावर नवऱ्या मुलाने दिलेले उत्तर अगदीच समर्पक आहे. डॉ. अजित यांनी ती उत्तरं आपल्या ट्विटमध्ये दिली आहेत.

पाहा फोटो :

GROOM TOUCHES FEET OF BRIDE

GROOM TOUCHES FEET OF BRIDE

नवऱ्या मुलाने काय उत्तरं दिली ?

नवरदेवाने आपल्या बायकोचे पाय का धरले असे त्याला सगळीकडे विचारण्यात येत आहे. त्यानंतर त्याने खालील उत्तरं दिली आहेत.

ती माझा वंश पुढे चालवणार आहे.

ती माझ्या घराची लक्ष्मी आहे.

ती माझ्या आई-वडिलांचा सम्नान करेल. तसेच त्यांची काळजी घेईल

मला वडील होण्याचं सुख देणार आहे. प्रसूतीवेळी मृत्यूच्या दाढेतून परत येणार आहे.

तिच्याच व्यवहारामुळे मी समाजात ओळखला जाणार आहे.

ती तिच्या आई-वडिलांना सोडून माझ्याकडे आली आहे.

हे सगळं जर ती माझ्यासाठी करत असेल, तर आपण तिला थोडा सन्मानसुद्धा देऊ शकत नाही का ? महिलांच्या पायासमोर डोकं झुकवणे जर हास्यास्पद असेल तर मला त्याची चिंता नाही, असे या नवऱ्या मुलाने म्हटले आहे.

दरम्यान, हा फोटो शोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर तो मोट्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक नवऱ्या मुलाचे तोंडभरून कौतूक करत आहेत.

इतर बातम्या :

Video | हवेच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर थरारक स्टंट, माणसाचं धाडस एकदा पाहाच

Video | प्रेयसीला पाहण्यासाठी जीवाची घालमेल, पठ्ठ्याने थेट नवरीचा साज चढवला, व्हिडीओ व्हायरल

Video | आकर्षक साज, हातात फुलं, गोड नवरी नवरदेवाकडे आली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

(Groom touches feet of his Bride in marriage program photo goes viral on social media)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.