Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ची अशीही लाट; मीम्स पाहून पोट धरून हसाल!

'नीचे से चेक कर..'; गुजरात निवडणुकीतील 'आप'च्या कामगिरीवर भन्नाट मीम्स व्हायरल

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची अशीही लाट; मीम्स पाहून पोट धरून हसाल!
गुजरात निवडणुकीतील 'आप'च्या कामगिरीवर भन्नाट मीम्स व्हायरल Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 11:30 AM

अहमदाबाद: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील आपच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. गुजराजमध्ये सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट दिसतेय. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून सत्ता खेचून घेणारी आम आदमी पार्टी गुजरातमध्ये फारशी कामगिरी करताना दिसत नाहीये. गुजरातमध्ये आप 6 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये आपला खातंही उघडला आलं नाही. यावरूनच सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत.

गुजराज निवडणुकीत आपने जोरदार प्रचार केला होता. आप गुजरातचा सर्वांगीण विकार करेल, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला दिलं. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजप सरकारवरही त्यांनी जोरदार टीका केली. तर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये आपचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावा केला होता.

हे सुद्धा वाचा

पहा भन्नाट मीम्स-

निवडणुकीचा कल पाहता आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे. त्यामुळे भाजपची ही धोक्याची घंटाही मानली जात आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंत आलेल्या निकालावरून भाजप 149 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी 8 जागांवर तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणून आपने दिल्ली महापालिकेवर झेंडा फडकावला. 2017 च्या तुलनेत यावेळी आपला 90 जास्त जागा मिळाल्या. तर भाजपच्या 64 जागा कमी झाल्या. काँग्रेसच्याही 19 जागांमध्ये घट झाली.

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?.
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.