‘तुस्सी जा रहे हो… तुस्सी ना जाओ’ Harbhajan Singhच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक, Social Mediaवर ढसाढसा रडले!
वयाच्या 17व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या हरभजन सिंहचं वय आता 41 आहे. बऱ्याच काळापासून हरभजन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नव्हता. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत होता.
ज्याला चाहते प्रेमानं आणि लाडानं भज्जी म्हणायचे, तो हरभजन सिंह यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) दिसणार नाही. हरभजन सिंहनं (Harbhajan Singh) निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही बातमी सोशल मीडियात (Social Media) वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर क्रिकेट विश्वातील हरभजन सिंहचे चाहते भावूक (Emotional) झालेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांनी हरभजनला भावनिक निरोप दिला आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणं हळहळलेले चाहते (Fans) सोशल मीडियात वेगवेगळ्या पोस्ट करत व्यक्त झाले आहेत. काही जणं हरभजन सिंहच्या निवृत्तीच्या घोषणनं निराश झालेत. तर काहींनी हरभजनला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
चाहत्यांना धक्का
वयाच्या 17व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या हरभजन सिंहचं वय आता 41 आहे. बऱ्याच काळापासून हरभजन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नव्हता. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत होता. अखेर त्यानं आज आपली अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिलाय.
All good things come to an end and today as I bid adieu to the game that has given me everything in life, I would like to thank everyone who made this 23-year-long journey beautiful and memorable. My heartfelt thank you ? Grateful .https://t.co/iD6WHU46MU
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2021
भज्जीचे आभार
यानंतर हरभजनच्या चाहत्यांनी त्याचे मनापासून आभार मानलेत. त्यानं दिलेल्या आठवणी या यादगार असून हरभजनला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Thanks for all the memories @harbhajan_singh ??
Another childhood hero & Member of 2011 WC winning squad & 2007 T20 WC winning squad retires
Also a Test Legend ✨
Happy Retirement Life ?#ThankyouBhajji #harbhajansingh pic.twitter.com/Kfc1oao4EY
— Tanmoy Chakraborty?⚕️ (@Tanmoycv01) December 24, 2021
हॅट्रिकची आठवण
हरभजन हा टेस्ट क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणार पहिला भारतीय गोलंदाज होता, याचीही आठवण चाहत्यांनी करुन दिली आहे.
Ganguly, Tendulkar, Laxman & Dravid were batting geniuses but without Harbhajan Singh India wouldn’t have won the famous 2001 series & the Kolkata Test. @harbhajan_singh & @RickyPonting‘s rivalry was one for the ages. Happy retirement!#HarbhajanSingh #Turbanator #BhajjiRetires
— Kanishka Raj Singh (@Kanishka183) December 24, 2021
तुस्सी ना जाओ
अमित जोशी नावाच्या युजरला हरभजनला निवृत्ती घेतल्याचं खूप दुःख झालंय. त्यानंतर तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ, म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न ट्वीटमधून केलाय. तसंच हरभजननं निवृत्तीची घोषणा केली असली, तरी त्याला लवकरच एका नव्या रोलमध्ये पाहायला आवडेल, असंही अमित जोशी यांनी म्हटलंय.
Ganguly, Tendulkar, Laxman & Dravid were batting geniuses but without Harbhajan Singh India wouldn’t have won the famous 2001 series & the Kolkata Test. @harbhajan_singh & @RickyPonting‘s rivalry was one for the ages. Happy retirement!#HarbhajanSingh #Turbanator #BhajjiRetires
— Kanishka Raj Singh (@Kanishka183) December 24, 2021
कनिष्का राज सिंह यांनी तर हरभजन आणि रिकी पॉन्टिंग यांच्यामध्ये होणाऱ्या फाईटच्याही आठवणी ताज्या केल्या आहेत. सोबतच सचिन, गांगुली आणि लक्ष्मणच्या फलंदाजीसोबत हरभजन सारख्या मॅचविनर गोलंदाजाचं महत्त्वही अधोरेखित केलंय.
Ganguly, Tendulkar, Laxman & Dravid were batting geniuses but without Harbhajan Singh India wouldn’t have won the famous 2001 series & the Kolkata Test. @harbhajan_singh & @RickyPonting‘s rivalry was one for the ages. Happy retirement!#HarbhajanSingh #Turbanator #BhajjiRetires
— Kanishka Raj Singh (@Kanishka183) December 24, 2021
इतर बातम्या –
’83’ चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं – रवी शास्त्री
IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर
Harbhajan Singh: ‘मी मनातून आधीच…’ निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन