ओय होय शर्मा गयीं क्या? लाजल्या बाई आजीबाई…एक नंबर व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला एक प्रश्न विचारायला जातो, "आजी? ती म्हणते, बेटा, विचार..."

आजी-नातवाच्या संभाषणाचा एक जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये जेव्हा तो तरुण आजीला आजोबांचं कधी चुंबन घेतलंय का असं विचारतो? तेव्हा या आजीची रिऍक्शन बघण्या सारखी असते. ही दादी इतकी लाजाळू आहे की पाहणारा फक्त पाहतच राहतो. खरं तर हे दोघंही भोजपुरीत बोलत आहेत, त्यामुळे त्यांची ही स्टाइलही बघण्यासारखी आहे. तुम्ही या आजींच्या फॅन व्हाल.
या व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला एक प्रश्न विचारायला जातो, “आजी? ती म्हणते, बेटा, विचार…” मग नातू विचारतो की “तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? दादी उत्तर देते- मी ७५ वर्षांची आहे, मी १२ वर्षांची असताना माझे लग्न झाले….”
यानंतर नातू विचारतो की दादाजींचं चुंबन कधी घेतलंय का? ज्यानंतर दादी, “हे भगवान… ” असं बोलते आणि इतकी लाजते की बास्स!
हा व्हिडिओ लोकांना प्रचंड भावलाय. १४ नोव्हेंबर रोजी tarun_dasil इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर केला होता. या क्लिपला २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, २.६३ लाखांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.
View this post on Instagram
काही युझर्सनी या क्लिपला क्यूट म्हटलं, तर काहींनी लिहिलं की, आपल्या बिहारमधील आजी सर्वात लाजाळू आहेत. त्याचबरोबर एका युझरने लिहिले की, ही बिहारी स्टाईल आमची मनं जिंकत आहे.
