या देशातील हॉटेलमध्ये मिळतो माणसाच्या मांसाचा बर्गर, बर्गर खरेदीसाठी लोकांचा रांगा
स्वीडनमधील एका रेस्टॉरंटने आपल्या मेनूमधील एका बर्गरमध्ये मानवी मांसाची चव असलेले मांस असल्याचा दावा केला आहे. पण, खरं सांगायचं झालं तर या बर्गरमध्ये वापरण्यात येणाऱ्या मांसाची चव फक्त मानवी मांसासारखी आहे, ते मानवी मांस नाही असं स्पष्टीकरण रेस्टॉरंटने दिले आहे.
जगात नॉनव्हेज प्रेमींची संख्या कमी नाही. प्रत्येक देश आणि प्रत्येक रेस्टॉरंट आपल्या खास नॉनव्हेज पदार्थांमुळे चर्चेत राहतो. लोक चिकन, मटण किंवा डुकराचं मटण आणि बीफ देखील खातात. पण रेस्टॉरंटमध्ये आता माणसांच्या मासांचे बर्गर देखील खायला दिले जातात हे जर तुम्हाला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही मस्करी करतोय. पण स्वीडनमधील एका रेस्टॉरंटने आपल्या मेनूमधील एका बर्गरमध्ये मानवी मांसाची चव असलेले मांस असल्याचा दावा केला आहे. पण, खरं सांगायचं झालं तर या बर्गरमध्ये वापरण्यात येणाऱ्या मांसाची चव फक्त मानवी मांसासारखी आहे, ते मानवी मांस नाही असं स्पष्टीकरण रेस्टॉरंटने दिले आहे. (Human meat flavored burgers for sale in Sweden. Crowds of people shopping for burgers)
मासांच्या मांसाची चव देणारं मांस!
या स्वीडिश कंपनीने सांगितले की, त्यांनी एक बर्गर बनवला आहे ज्याची चव मानवी मांसासारखी आहे. हा बर्गर गेल्या आठवड्यातच लाँच झाला आहे. ह्युमन मीट बर्गर सुप्रसिद्ध कंपनी ओम्फ (Oumph)ने बनवला आहे. पण खरं पाहायला गेलं तर ही कंपनी वनस्पतींचा वापर करुन मांस बनवते. म्हणजे हे मांस नाही तर त्याची चव आणि रचना फक्त मांसासारखी आहे. म्हणजेच मानवी मांसाच्या चवीच्या या बर्गरमध्ये मानवी मांसाचा वापर केलेला नाही. प्राण्यांना किंवा माणसांना इजा न करता मांस बनवता येते हे लोकांना सांगण्यासाठी त्यांनी असा बर्गर लाँच केल्याचे कंपनीने म्हटलं आहे. ज्याची चव खऱ्या मांसासारखीच असते.
नेटकरी कंपनीच्या ऑफरवर भडकले!
पण असं असलं तरी सोशल मीडियावर या कंपनीवर सडकून टीका केली जात आहे. लोकांनी याला घृणास्पद असल्याचं म्हटलं आहे. लोक म्हणाले की, कुणाला कसं माणसाचं मांस खावंसं वाटेल, कंपनीच्या या आयडीयाचीच किळस येते. एका युजरने लिहलं की, कंपनीला कसं कळालं की मानवी मांस चवीला कसं असतं, याचा अर्थ कुणीतरी खरंखुरं मानवी मांस टेस्ट केलं तर नाही ना?
खरं नाही तर वनस्पती मांस!
या सगळ्यावर कंपनीच्या सह-संस्थापकांनी याबद्दल सांगितले की, त्यांनी असं अनोखं टेस्ट मीट बनवले आहे, जे खूप चवदार आहे. या बर्गरच्या माध्यमातून कंपनी लोकांना सांगू इच्छिते की, वनस्पतीपासून बनवलेलं मांस देखील खायला चवदार असतं. मात्र, हा बर्गर कंपनी हॅलोविनपर्यंतच देणार आहे.
हेही पाहा:
Video: पायऱ्यांवरुनही जड सामान नेण्यासाठी जुगाडू गाडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा कामाचा जुगाड आहे!
Video: ‘हुस्न है दिवाना’वर नवरीसह मैत्रिणींचा भन्नाट डान्स, सिंगल पोरं म्हणाली, आम्हालाही अशीच बायको हवी!