Viral Video | पतीने केली पत्नीसोबत मस्करी, असा प्रँक कधी पाहिला नसेल, व्हिडीओ व्हायरल

नेटकरी प्रँक व्हिडीओ आवडीने पाहतात. सध्या असाच एक प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत भन्नाट अशी मस्करी केलीय. व्हिडीओ पाहून नेटकरी तर लोटपोट झाले आहेत.

Viral Video | पतीने केली पत्नीसोबत मस्करी, असा प्रँक कधी पाहिला नसेल, व्हिडीओ व्हायरल
HUSBAND WIFE PRANK VIDEO
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:00 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. यातील काही व्हिडीओ फारच मजेदार असतात. तसेच काही व्हिडीओ पाहून आपण हरखून जातो. सध्या तर सोशल मीडियावर प्रँक व्हिडीओचे खूळ लोकांच्या डोक्यात भरले आहे. नेटकरी प्रँक व्हिडीओ (Prank Video) आवडीने पाहतात. लोकांना प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओदेखील खूप आवडतात. सोशल मीडियावर अशा व्हिडीओंना हजारो लाईक्स आणि कमेंट्स असतात. सध्या असाच एक प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत भन्नाट अशी मस्करी केलीय. व्हिडीओ पाहून नेटकरी तर लोटपोट झाले आहेत. व्हिडीओमध्ये पती पत्नी यांच्यातील गोड नातं दाखवण्यात आलं आहे. तसेच त्यांनी एकमेकांसोबत केलेली मस्करीदेखील व्हिडीओमध्ये पाहण्यासाऱखी आहे.

समोर साप पाहून अगोदर पती घाबरला

व्हिडीओमध्ये पतीने आपल्या पत्नीसोबत प्रँक केला आहे. त्यासाठी त्याने बनावट सापचा आधार घेतलाय. त्याने दरवाजात काळ्या रंगाचा बनावट साप ठेवला आहे. तर दुसरीकडे तो आपल्या पत्नीसोबत घराच्या बाहेर येत आहे. सुरुवातीला आपल्याला मोठा साप दिसला आहे, असे भासवत पतीने घाबरण्याचे नाटक केले आहे. आपल्याला घाबरलेलं पाहून आपली पत्नीदेखील घाबरून जाईल असं व्हिडीओतील माणसाला वाटले असावे. मात्र पती घाबरल्याचे पाहून पत्नीने मात्र वेगळेच हावभाव दिले आहेत. तिने आपल्या पतीला मुर्खात काढलं असून समोरचा साप नकली असल्याचं म्हणत सापाला पकडण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर मात्र पत्नीची चांगलीच मज्जा आली आहे. साप पळून गेल्यानंतर पत्नीच्या अंगाचा थऱकाप उडालाय.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ? (@hepgul5)

हात समोर करताच पत्नी चांगलीच घाबरली

पती प्रँक करत असावा असा उद्देश समोर ठेवून पत्नीने सापाला पकडण्यासाठी हात समोर केला आहे. मात्र हात समोर करताच सापाने पळ काढल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. मुळात व्हिडीओमध्ये दिसणारा साप हा बनावट आहे. मात्र व्हिडीओमध्ये तयार करण्यात आलेलं नाटक नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. महिला घबरल्याचं नाटक करत आहे, असे काही नेटकरी म्हणत आहेत. मात्र हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहता येईल.

इतर बातम्या :

चिमुरड्यानं स्वीकारलंय पाणीपुरी खाण्याचं चॅलेंज आणि तुम्ही? ‘हा’ Video पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!

टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.