AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बायकोच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, पण मध्येच घोळ झाला, पतीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आणि धम्माल उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणसू आपल्या पत्नीच्या चोहऱ्याला काळे फासण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी घरातील सोफ्यावर झोपलेली असताना माणूस हा कारनामा करण्याचा प्रयत्न करतोय.

Video | बायकोच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, पण मध्येच घोळ झाला, पतीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल
husband wife viral video
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 4:24 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. प्रँक व्हिडीओ तर एवढे मजेदार असतात, ज्यांना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या आपल्या पत्नीची मस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीची चांगलीच परेशानी झाली आहे. (husband prank with his wife went wrong video went viral on social media)

महिला सोफ्यावर निवांतपणे झोपली  

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आणि धम्माल उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणसू आपल्या पत्नीच्या चेहऱ्याला काळे फासण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी घरातील सोफ्यावर झोपलेली असताना माणूस हा कारनामा करण्याचा प्रयत्न करतोय.

व्हिडीओ मध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एका माणसाने त्याच्या हाताला काळा रंग लावला आहे. हाच काळा रंग तो त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर फासण्याच्या बेतात आहे. काळा रंग लावलेला आपला हात घेऊन तो सोफ्यावर झोपलेल्या पत्नीकडे जात आहे. मात्र, मध्येच मोठा घोळ झाला आहे. व्हिडीओतील माणसाला शिंक आली आहे. समोर पत्नी झोपलेली असताना काय करावे त्याला समजत नाही. शिंक आल्यामुळे ती थोपवणेही त्याला अवघड होऊन बसले आहे. शेवटी आपण शिंकल्यामुळे आवाज होईल म्हणून काळा रंग लावलेला हात माणसाने स्वत:च्याच चेहऱ्याला लावला आहे. परिणामी पत्नीचा चेहरा काळा करण्याचा प्रयत्न करण्याच्या वेडापाई व्हिडीओतील माणसाचाच चेहरा काळा झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सगळा प्रसंग कॅमेऱ्यामध्ये शूट करण्यात आला आहे. हा एक स्क्रिप्टेड व्हिडीओ आहे. असे असले तरी व्हिडीओमध्ये दाखवलेला घटनाक्रम मात्र भन्नाट आणि खळखळून हसवणारा आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला इन्स्टाग्रामवर hepgul5 या अकाऊंवटर शेअर करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : महिलेची Cute डॉल्फिनसोबत मस्ती, व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू…

महिला स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानी मीडियाचा बुरखा फाटला, तालिबान्यांच्या समर्थनार्थ महिला अँकरने लाईव्ह शोमध्येच हिजाब घातला!

Video: मधोमध स्पीडबोट, दोन्ही बाजूला पक्ष्यांचा थवा, नजरा पाहून नेटकरी म्हणाले, ‘दिवस कारणी लागला!’

(husband prank with his wife went wrong video went viral on social media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.