नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

पुष्पा सिनेमाच्या कमाईनं रोज नवनवे रेकॉर्ड तोडत बॉक्सऑफसवर आपला दबदबा कायम ठेवलाय. दुसरीकडे पुष्पाच्या गाण्यांचीही क्रेझ महिना उलटून गेला तरीही कायम आहे. आजही पुष्पा सिनेमाची गाणी सर्व सोशल साईट्सवर ट्रेन्डिंगमध्ये आहेत.

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता 'Saami Saami'वर ठेका धरलाय राव
किली पॉलचा सामी सामी वर डान्स
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 4:31 PM

नाव किली पॉल (Kili Paul) . काम, नुसती इन्स्टाग्रामवर हवा करायची भाव! इन्स्टावर भारतीय सिनेमांच्या गाण्याचे रिल्स करण्यात माहीर असणाऱ्या किलीनं आणखी एक किलर रिल तयार केलाय. इन्स्टाग्रावर त्यांनं शेअर केलेला हा मी व्हायरल झाला नसता तरच नवल! रश्मिका मंधनानं (Rashmika Mandana) पुष्पा द राईज सिनेमात केलेल्या डान्सला टक्कर देत किली भाऊंनी इन्स्टावरील सगळ्यांना आपल्या आणखी एका टॅलेंटची झलक दाखवली आहे. अर्थात किली भावालही हे गाणं तुफान आवडलंय. शिवाय त्याला फॉलो करणाऱ्यांना किलीचा डान्सही आवडला आहेच. हिंदी गाण्याचं रिल्स बनवणारा किली पॉल हा अल्पावधीच भारतात लोकप्रिय झाला आहे. आफ्रिकेतील या अवलियानं आपला वेगळा फॅन फॉलोअर भारतातही तयार केलाय. आता गाजलेल्या पुष्पा सिनेमावर (Pushpa The Rise Movie) त्यानं केलेलं डान्स वर्जनही तुफान व्हायरल झालं आहे.

पुष्पा सिनेमाच्या कमाईनं रोज नवनवे रेकॉर्ड तोडत बॉक्सऑफसवर आपला दबदबा कायम ठेवलाय. दुसरीकडे पुष्पाच्या गाण्यांचीही क्रेझ महिना उलटून गेला तरीही कायम आहे. आजही पुष्पा सिनेमाची गाणी सर्व सोशल साईट्सवर ट्रेन्डिंगमध्ये आहेत. सामी सामी असेल, समांथाचं आयमच सॉन्ग असेल, किंवा मग हल्लीच गाजू लागलेलं स्रीवल्ली हे गाणं असेल. प्रत्येक गाण्याला भरभरुन दाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

सामी सामी हे गाणं पुष्पा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच ट्रेन्डिंगमध्ये होते. या गाण्यानं युट्युबवर हिट्सचे रेकॉर्ड तोडले आहे. सगळ्याच भाषांमधलं हे गाण तुफान गाजत आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवले होते. खुद्द रश्मिका मंधानानेही या गाण्यावर रिल्स तयार केलं होतं. दरम्यान, आता इन्स्टाग्राम स्टार किली पॉलनेही आपल्या अंदाजात या गाण्यावर ठेका धरलाय. किली पॉलचा हा व्हिडीओ तुफान गाजत असून अनेकांनी त्याच्या डान्सला लाईक केलं आहे.

पाहा किली पॉलचा हा खास व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सामी सामी हे पुष्पा सिनेमातील गाणं असून हे गाणं रश्मिका मंधाना आणि अल्लू अर्जुन यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. मौनिका यादवनं गायलेलं हे गाणं सध्या प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देवी श्री प्रसाद यांनी या गाण्यला संगीतबद्ध केलंय.

पाहा या ओरिजनल गाण्याचीही खास झलक –

संबंधित बातम्या –

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई

BTS Video | समंथा प्रभूची आयटम साँगसाठी प्रचंड मेहनत, ‘Oo Antava’चा हा रिहर्सल व्हिडीओ पाहिला का?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.