Instagram Viral: छोटंसं बाळ करतंय व्यायाम! आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल…
त्याच वेळी मुलानेही आपल्या आईकडे पाहताना नेमके तेच करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला, नाहीतर 5 महिन्यांचं बाळ आईसारखाच व्यायाम करतं यावर कुणाचा विश्वास बसला नसता.
मुलं नेहमीच आपल्या आई-वडिलांना बघण्याचा आणि त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं करताना पाहून नक्कीच आनंद होतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) केलेला एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील हास्य वाढेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाच महिन्यांचे बाळ व्यायाम करतंय. ऑस्टिन असं या बाळाचं नाव असून तिची आई व्यायाम करत आहे. तिचे मूलही तिच्या शेजारीच पडून आहे आणि तसा व्यायाम (Exercise) करण्याचा प्रयत्न करतंय.
5 महिन्यांचा मुलगा आईसारखा व्यायाम करतो
आई जेव्हा व्यायामासाठी चटईवर आडवी असते, तेव्हा तिचं मूलही आडवं पडून तिला पाहत असतं. आईने आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवले आणि दोन्ही पाय मागे ओढले. त्याच वेळी मुलानेही आपल्या आईकडे पाहताना नेमके तेच करायला सुरुवात केली. हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला, नाहीतर 5 महिन्यांचं बाळ आईसारखाच व्यायाम करतं यावर कुणाचा विश्वास बसला नसता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे 5 महिन्यांचे बाळ नवीन गोष्टी शिकत आहे.” बाळाच्या आईने पुढे खुलासा केला आहे की तिला आपल्या बाळाचा अभिमान आहे आणि आशा आहे की बाळ आईसारखे मजबूत होईल.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ व्हायरल
आठवडाभरापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 24 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, तर 15 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. फिटस्टाग्राम डॉट मिशेल नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर 42,500 हून अधिक फॉलोअर्स आहेत. मिशेल अमेरिकेतील नॉर्वॉक येथील रहिवासी आहे. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले, “किती प्रभावी! वॉच आऊट वर्ल्ड’. आणखी एक युझर म्हणाला, “हे आश्चर्यकारक आहे.”
ओडिशाची हिरकणी वायरल!
असाच एक व्हिडीओ भारतातून वायरल होतोय. एक आई आपल्या मुलाला पाठीवर बांधून रस्ता झाडताना दिसून येतीये. हा व्हिडीओ ANI ने पोस्ट केलाय आणि सोबतच हा ट्विटरवरसुद्धा प्रचंड वायरल होतोय. ती मूळची ओडिशाची असून गेली 10 वर्षे बारीपाडा नगरपालिकेत झाडलोटचे काम करते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितले की, ती तिच्या घरात एकटीच असते. त्यामुळे तिला तिच्या मुलाला पाठीवर बांधून काम करावे लागते. ही तिच्यासाठी अडचण नसून हे तिचे कर्तव्य आहे, असे महिलेचे म्हणणे आहे. व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.