IPS कडून DGP ला सलाम, व्हिडीओची प्रचंड चर्चा! काय आहे खास यात?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, DGP आणि IPS कसे एकमेकांना सलाम करतात आणि मग IPS मुलगी चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन DGP पर्यंत पोहोचते आणि त्यांच्यासोबत फोटो काढू लागते.
एक काळ होता जेव्हा मुलींना ओझं मानलं जायचं. कुणाच्या घरी मुलगी जन्माला आली की त्यांना दु:ख व्हायचे. मुलींच्या जन्मापासून लोक त्यांच्या लग्नाची, हुंड्याची वगैरे चिंता करत असत, पण आता तसे वातावरण राहिलेले नाही. शिक्षणामुळे लोकांचा हा विचार बऱ्याच अंशी बदलला आहे. आता लोकांनी मुलींना शिकवायला, लिहायला आणि त्यांना सक्षम बनवायला सुरुवात केली आहे. वाचून-लिहून मुलगी मोठ्या पदावर पोहोचली तर तो तिच्या आई-वडिलांसाठी अभिमानाचा क्षण असतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आयपीएस मुलगी आपल्या डीजीपी वडिलांना सलाम करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील आणि मुलगी कसे एकमेकांना सलाम करतात आणि मग मुलगी चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन वडिलांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यासोबत फोटो काढू लागते. हे दृश्य आसाममधील आहे, जिथे डीजीपी जीपी सिंह आहेत आणि त्यांच्या मुलीचे नाव ऐश्वर्या सिंह आहे.
ऐश्वर्या आयपीएस अधिकारी आहे आणि आता ती तिच्या वडिलांच्या हाताखाली काम करेल, ती तिच्या डीजीपी वडिलांना रिपोर्ट करेल. एका मुलीला तिच्या वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे आणि मुलगी अधिकारी बनली आहे. वडिलांचे नाव उज्ज्वल करत आहे यापेक्षा आनंदाची भावना वडिलांसाठी असू शकत नाही.
आसामचे डीजीपी जी. पी. सिंह यांनी स्वत: आपल्या ट्विटर हँडलवर हा शानदार व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्याकडे शब्द नाहीत. मुलगी ऐश्वर्याकडून सलाम. ती पोलिस अकादमीतून बाहेर पडली.”
Words fail me. Received the salute from daughter @aishwarya_ips as she passed out of @svpnpahyd today. Picture courtesy @lrbishnoiips pic.twitter.com/aeHoj9msYG
— GP Singh (@gpsinghips) February 11, 2023
अवघ्या 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 56 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 9 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जण वडिलांसाठी हा ‘अभिमानाचा क्षण’ असल्याचे सांगत आहेत, तर कोणी ‘हा अतिशय मार्मिक आणि आनंदाचा क्षण आहे’, असे म्हणत आहेत.