IRS ऑफिसरने शेअर केला #jugaad व्हिडीओ! विजेशिवाय चालणारा पंप तुम्हालाही आवडेल
चांगल्या उत्पादनासाठी सिंचन किती महत्त्वाचे आहे, हे ज्यांना शेती समजते त्यांना चांगलेच कळते. त्याचबरोबर त्यासाठी डिझेल आणि विजेचा खर्च जास्त आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे शेतात पाणी पोहोचविण्यासाठी अनेक यंत्रे तयार करण्यात आली आहेत. पण छोट्या शेतकऱ्याकडे महागडी यंत्रे विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, डिझेल आणि वीज परवडत नाही.
मुंबई: भारतात जुगाड तंत्र हे मोठ्या प्रमाणावर चालणारे तंत्र आहे. लोक इतके मस्त जुगाड लावतात की यात पैसा, वेळ या सगळ्या गोष्टींची बचत होते. विशेष म्हणजे हा जुगाड लावताना ते फारसं लॉजिक न लावता आपलं काम कसं पूर्ण होईल यावर फोकस करतात आणि काम पूर्ण होतंच. शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शेती म्हटलं की अनेक गोष्टींची गरज आलीच. या गोष्टींवर खर्च करण्याऐवजी, महाग गोष्टी घेण्याऐवजी जर जुगाड केला तर? असाच काहीसा जुगाड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघण्यासारखा आहे. एका IRS ऑफिसरने हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
चांगल्या उत्पादनासाठी सिंचन किती महत्त्वाचे आहे, हे ज्यांना शेती समजते त्यांना चांगलेच कळते. त्याचबरोबर त्यासाठी डिझेल आणि विजेचा खर्च जास्त आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे शेतात पाणी पोहोचविण्यासाठी अनेक यंत्रे तयार करण्यात आली आहेत. पण छोट्या शेतकऱ्याकडे महागडी यंत्रे विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, डिझेल आणि वीज परवडत नाही. अशा परिस्थितीत पाईप टाकून पिकाला सिंचन करणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो.
Start 10HP pump without electricity.#jugaad pic.twitter.com/rd87kCIwGO
— Sugrive Meena IRS🇮🇳 (@MeenasSugrive) August 11, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे हे सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आयआरएस अधिकाऱ्याने @MeenasSugrive आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- १० एचपीचा पंप विजेशिवाय चालतो. 10 मिनिट 2 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एका सेटअपमध्ये बॅटरीसह काही गोष्टी जोडण्यात आल्याचं दिसत आहे. याशिवाय ज्या नळातून पाणी बाहेर पडते त्या समोरच्या नळाला पंपाचा भाग जोडण्यात आला आहे. तसेच खाली लावलेल्या मोठ्या फलकावर छोटे बल्ब असतात. एक व्यक्ती काही वेळ चाक फिरवते, त्यानंतर बाजारात मिळणाऱ्या यंत्राप्रमाणे पाणी येऊ लागते. हा जुगाड एकदम मस्त आहे. तुम्हालाही नक्की आवडेल.