Jadu Ki Jhappi Viral: जादू की झप्पीने लावली ना वाट! ऑफिसमध्ये मिठी मारली,1 लाख 16 हजारांचा दंड भरावा लागला

ही जादू की झप्पी इतकी घट्ट होती की या जादू की झप्पी देणाऱ्याला आता आर्थिक नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अजब आहेना? काय आहे संपूर्ण किस्सा...

Jadu Ki Jhappi Viral: जादू की झप्पीने लावली ना वाट! ऑफिसमध्ये मिठी मारली,1 लाख 16 हजारांचा दंड भरावा लागला
Jadu ki Jhappi ViralImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 11:11 AM

काही वर्षांपूर्वी मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) सिनेमा आला होता. या सिनेमातील अनेक गोष्टी गाजल्या होत्या. गाणी, त्यातली पात्रं, त्यातले जवळपास सगळेच डायलॉग्स प्रचंड गाजले. चित्रपटातली जादू की झप्पी (Jadu Ki Jhappi) चांगलीच फेमस झाली. चित्रपटात एक सीन होता ज्यात मुन्नाभाई सांगत असतो ज्यात मुन्नाभाई जादू की झप्पीचं म्हणजे मिठी मारायचं महत्त्व सांगतो. हा मुन्नाभाई चित्रपटात सगळ्यांनाच ज्यांच्या आयुष्यात दुःख असतं त्यांना किंवा काहींना थँक यु म्हणायला जादू की झप्पी देत असतो. त्यानंतर या जादू की झप्पीचं बरंच वेड आलं.असाच एक किस्सा आता व्हायरल (Viral) होतोय. चीनच्या हुनान प्रांतातील युयांग शहरातील ही घटना आहे. इथल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या महिला सहकाऱ्याला जादू की झप्पी दिली. ही जादू की झप्पी इतकी घट्ट होती की या जादू की झप्पी देणाऱ्याला आता आर्थिक नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अजब आहेना? काय आहे संपूर्ण किस्सा…

 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड

चीनच्या हुनान प्रांतातील युयांग शहरातील ही घटना आहे. येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या महिला सहकाऱ्याला घट्ट मिठी मारली.आपल्या ऑफीसमधील एका महिला कर्मचाऱ्याला मिठी मारणे या व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या व्यक्तीला कोर्टाने चक्क 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भावनेच्या आहारी त्याने मारलेली मिठी इतकी घट्ट होती की त्यामध्ये या महिलेची चक्क तीन हाडे मोडली. ती महिला वेदनेने कळवळू लागली. वेदना असह्य झाल्यावर तिने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी या महिलेला एक्स-रे काढण्यास सांगितले ज्यात तिच्या उजव्या बाजूला दोन व डाव्या बाजूला एक अशा बरगड्यांना दुखापत झाल्याचे समजले. अशा परिस्थितीत तिला ऑफिसला जाणे शक्य झाले नव्हते. तिने त्या सहकाऱ्याची भेट घेऊन त्याला नुकसानभरपाई देण्यास सांगितले, त्याने मात्र तिच्या मागणीला नकार दिल्याने या महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने महिलेची बाजू ऐकल्यानंतर या पुरूष सहकाऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.