त्याने तिच्या शर्टमध्ये हात घातला, अन्…मेट्रो स्टेशनवरील कपलने मर्यादाच ओलांडली; व्हिडीओ व्हायरल!
दुसरीकडे काही लोकांनी लपून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कृतीलाही विरोध केला आहे. तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीचे लपून आणि संबंधित व्यक्तीच्या परवानगीविना रेकॉर्डिंग करू शकत नाही.

Bangalore Metro Station Couple Viral Video : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मेट्रोमधील एका तरुणीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. प्रवास करताना तिने परिधान केलेल कपडे तेव्हा चांगलाच चर्चेचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे या तरुणीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. असे असतानाच आता बंगळुरु येथील मेट्रो स्टेशनवरील एका कपलचा विचित्र व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार सध्या व्हायरल झालेला तरुण-तरुणीचा हा व्हिडीओ कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरातील नम्मा मेट्रो स्टेशनवरील आहे. Karnataka Portfolio या ट्विटर अकाऊंटवरून हा पोस्ट करण्यात आला होता. आता हाच व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना बंगळुरू शहर हे दिल्लीच्या दिशेने वाटचाल करत आहे का? असा प्रश्न या ट्विटर युजरने केला आहे.
तसेच नम्मा मेट्रो स्टेशनवील या वर्तनामुळे सभ्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही त्या युजरने म्हटले आहे. सर्वजनिक ठिकाणावर अशा प्रकारचे वर्तन करणे हे फारच निराशाजनक आणि चिंताजनक आहे, असंही या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय.
व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी मेट्रो स्टेशनवर मेट्रोची वाट पाहात उभे आहेत. समोर तरूणी उभी आहे तर तिच्या मागे तरुण उभा राहिलेला आहे. मेट्रोची वाट पाहात असतानाच हा तरुण तिच्या गर्लफ्रेंडसोबत अश्लिल वर्तन करताना दिसतोय. विशेष म्हणजे व्हिडीओतील तरुणीही त्याला थांबवताना दिसत नाहीये. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे.
A video of a young couple allegedly behaving inappropriately at a Metro station in #Karnataka‘s #Bengaluru has surfaced online on Friday. The incident reportedly took place at the #Madavara Metro station.
In the video of duration one minute 30 seconds, it could be seen that a… pic.twitter.com/Kj1jP3F14Q
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) April 11, 2025
सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. अद्याप बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे काही लोकांनी लपून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कृतीलाही विरोध केला आहे. तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीचे लपून आणि संबंधित व्यक्तीच्या परवानगीविना रेकॉर्डिंग करू शकत नाही. समोरचे कपल हे चुकीची गोष्ट करत असेल तर लपून व्हिडीओ रेकॉर्ड करणेही तेवढेच चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
